-रवींद्र मोरेकानपुरच्या बिकरु गावात आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेला अलिकडे एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आले. विकास दुबेला उज्जैनच्या महाकाल मंदिर परिसरात अटक करण्यात आली होती. एन्काउंटरच्या अगोदर मीडियाच्या गाड्या अडविल्याच्या कारणाने पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत आहेत, अशातच या दरम्यान सोशल मीडियावर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत आला.रोहित शेट्टीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलीस आणि गुंडांदरम्यान अॅक्शन सीक्वेंस दाखविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रोहितच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एन्काउंटरदेखील दाखविण्यात आले आहेत. अशातच चाहते विकास दुबे एन्काउंटरला रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी तुलना करताना दिसत आहेत.एका यूजरने लिहिले आहे की, रोहित शेट्टीला चित्रपट बनविण्याअगोदर यूपी पोलिसांकडून प्रेरणा घ्यायला हवी. कारला उलटी करणे, गुंडाचे पडणे आणि त्याला गोळी मारणे...अन्य एका यूजरने लिहिले आहे की, रोहित शेट्टी ठरवेल की, शेवटी कार उडवायची आहे की, खाली पाडायची आहे. अजून एका यूजरने रोहित शेट्टीची मजा घेताना लिहिले आहे की, ‘आता रोहित शेट्टी म्हणत असेल की, ही तर माझी स्क्रिप्ट आहे. ज्या पद्धतीने कार पलटी झाली आहे, मी विचार करत आहे की, रोहित शेट्टीला या स्क्रिप्टसाठी बोलविण्यात आले होते.’एका यूजरने तर रोहित शेट्टीच्या सोबत अनुराग कश्यपचेही नाव घेऊन लिहिले आहे की, विकास दुबेवर चित्रपट बनला तर रोहित शेट्टी त्याला चित्रपटात व्हिलेन बनवेल आणि जर त्याला नायक बनवले गेले तर तो चित्रपट अनुराग कश्यप बनवेल.’अजून एका यूजरने लिहिले आहे की, ‘मला वाटते की, यावेळी रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार सर्वात आनंदी झाले असतील. ते सूर्यवंशीचा पुढचा भाग बनवू शकतील. काय चित्रपटाला शोभेल असा एन्काउंटर आहे. शाब्बास पोलीस...’रोहित शेट्टीच्या चित्रपटांबाबत बोलायचं झाले तर या दिग्दर्शकाने आतापर्यंत बॉलिवूडला बरेच अॅक्शन हिट चित्रपट दिले आहेत. अजय देवगनचा ‘सिंघम’, रणवीर सिंहचा ‘सिंबा’ असे चित्रपट आहेत ज्यात अॅक्शन भरपूर प्रमाणात आहे. त्याचा आगामी असाच एक चित्रपट आहे, तो म्हणजे अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’.विकास दुबेला उज्जैनहून काल सकाळीच कानपुर घेऊन जात होते. कानपुर येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. याच दरम्यान विकास दुबेने एका पोलिसांकडील बंदुक हिसकावून पडण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे आणि पोलिसांच्या दरम्यान झालेल्या झटापटीत विकास दुबेला गोळी मारण्यात आली, आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यात काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
विकास दुबे एन्काउंटर आणि चर्चेत आला रोहित शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:52 PM
रोहित शेट्टीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलीस आणि गुंडांदरम्यान अॅक्शन सीक्वेंस दाखविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर रोहितच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये एन्काउंटरदेखील दाखविण्यात आले आहेत. अशातच चाहते विकास दुबे एन्काउंटरला रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी तुलना करताना दिसत आहेत.
ठळक मुद्देरोहित शेट्टीच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये पोलीस आणि गुंडांदरम्यान अॅक्शन सीक्वेंस दाखविण्यात आला आहे.विकास दुबे एन्काउंटरला रोहित शेट्टीच्या चित्रपटांशी तुलना करताना दिसत आहेत.सोशल मीडियावर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी चर्चेत आला.