Join us

Vikram Bhatt Wedding: म्हणून विक्रम भट यांनी वर्षभर लपवून ठेवली लग्नाची बातमी; आता झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 11:43 AM

Vikram Bhatt Wedding: 2016 मध्ये झाली होती विक्रम भट व श्वेतांबरीची पहिली भेट, यामुळे घेतला लग्नाचा निर्णय

ठळक मुद्देविक्रम भट यांचे पहिले लग्न अदिती भट यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगी आहे. तर श्वेतांबरीला पहिल्या पतीपासून दोन मुलं आहेत. 

बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक विक्रम भट  (Vikram Bhatt) सध्या त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत. होय, वयाच्या 52 व्या वर्षी विक्रम यांनी श्वेतांबरी सोनी (Shwetambari Soni) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.  लग्न गेल्यावर्षीचं झालं. पण या लग्नाची भणकही त्यांनी कोणाला लागू दिली नव्हती. काल वर्षभरानंतर या लग्नाचा खुलासा झाला. विक्रम भट यांनी पत्नीसाठी (Vikram Bhatt wife ) स्पेशल पोस्ट लिहित या लग्नाची घोषणा केली. सोबतच श्वेतांबरीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात.वर्षभर लग्नाची बातमी लपवून ठेवली. फक्त त्यांचे कुटुंबीय व जवळच्या मित्रांनाच या लग्नाची माहिती होती. विक्रम भट यांनी वर्षभर लग्न झाल्याचं का लपवून ठेवलं, तेही आता स्पष्ट झालं आहे. एका मुलाखतीत ते आपल्या सीक्रेट मॅरेजवर बोलले. (Vikram Bhatt Wedding)

काय म्हणाले विक्रम भट?आमच्या घरीच श्वेतांबरीच्या तीन बहिणी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत आमचं लग्न झालं. हा एक छोटासा व साधा सोहळा होता. आधी आम्ही थाटामाटात लग्न करण्याचा विचार करत होतो. पण कोरोना महामारीमुळे आमचा अख्खा  प्लान खराब झाला. माझे जवळचे मित्रही लग्नात सहभागी होऊ शकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.लव्हस्टोरीचा खुलासाही त्यांनी केला. श्वेतांबरी व मी 2016 मध्ये पहिल्यांदा भेटलो होतो. यानंतर तीन वर्ष आम्ही एकमेकांना डेट केलं. तीन वर्षानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. माझे वडिल हॉस्पीटलमध्ये होते आणि डॉक्टरांनी त्यांना अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी श्वेतांबरीला अचानक लग्नाबद्दल बोलली. आपल्या दोघांपैकी एकालाही काही झालं तर, कायदेशीर अधिकार असेपर्यंत आपण कुठलंही पाऊल उचलू शकणार नाही, असं तिला जाणवलं आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतला, असं ते म्हणाले.लग्नानंतरही वर्षभर दोघांनीही लग्न जगपासून लपवून ठेवलं. याचं कारण म्हणजे, दोघेही त्यांच्या मुलांनी हे लग्न स्वीकारण्याची प्रतीक्षा करत आहे.  विक्रम भट यांचे पहिले लग्न अदिती भट यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगी आहे. तर श्वेतांबरीला पहिल्या पतीपासून दोन मुलं आहेत. 

टॅग्स :विक्रम भटबॉलिवूड