Join us

'दीपिकापेक्षा मला कमी...', फिल्म इंडस्ट्रीत मिळणाऱ्या मानधनात तफावत; विक्रांत मेस्सीने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 10:22 AM

विक्रांतने 'छपाक' या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण बरोबर काम केलं होतं.

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने (Vikrant Massey)  आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली. 'बालिका वधू' ते 'गॅसलाईट' असा त्याचा टीव्ही ते सिनेमा प्रवास आहे. मात्र बॉलिवूडमधील मानधनाचा मुद्दा त्यानेही उचलला आहे. विक्रांतने 'छपाक' या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बरोबर काम केलं होतं. मात्र या सिनेमात त्याला दीपिकापेक्षा फार कमी मानधन मिळालं. नुकताच त्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

फिल्म इंडस्ट्री मिळणाऱ्या मानधनात किती तफावत आहे याविषयी विक्रांत मेस्सीने बातचीत केली आहे. तो म्हणाला,'छपाक सिनेमाने बॉक्सऑफिसवर फारशी कमाई केली नाही. पण मला या सिनेमावर गर्व आहे. छपाकच्या अपयशाला बरीच राजकीय कारणं आहेत. माझ्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीला माझ्यापेक्षा जास्त पैसे मिळाले आहेत. पण मी कधीच यावर भाष्य केले आहे. मी मेहनतीने जे काम केलंय ते बघून सुद्धा मला दीपिका पदुकोण इतके पैसे ऑफर झाले नाही.'

ओटीटीवर नुकत्याच आलेल्या 'गॅसलाईट' या सिनेमात विक्रांतने भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत आहे. विक्रांतने रणवीर सिंह सोबत 'लुटेरा' सिनेमातही काम केले होते. यामधील त्याच्या अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. याशिवाय त्याने तापसी पन्नूसोबत हसीन दिलरुबा सिनेमात काम केले आहे.

टॅग्स :विक्रांत मेसीदीपिका पादुकोणबॉलिवूड