Join us

दिल दोस्ती़ मधील विनोद हरपला

By admin | Published: September 26, 2015 12:47 AM

मालिका सुरू होण्यापूर्वीच इम्प्रेशन पाडणाऱ्या जाहिराती, जाहिराती बघून ‘फ्रेन्डस’ या इंग्लिश मालिकेशी केली जाणारी कम्पॅरिझन. मात्र या तुलनेला फाटा

मालिका सुरू होण्यापूर्वीच इम्प्रेशन पाडणाऱ्या जाहिराती, जाहिराती बघून ‘फ्रेन्डस’ या इंग्लिश मालिकेशी केली जाणारी कम्पॅरिझन. मात्र या तुलनेला फाटा देत वेगवेगळे विषय हाताळत आलेख उंचावत गाठलेली एक विशिष्ठ उंची, पण फुग्यातील हवा जाते, त्याप्रमाणे विषयच काही न उरल्यावर मालिका सुरू ठेवायची म्हणून काहीतरी दाखवत राहण्याचा बांधलेला चंग, ही गत झाली आहे ती केवळ कलाकारांमुळे फेमस झालेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेची. कलाकारांच्या अ‍ॅक्टिंगपेक्षाही त्यांच्यातील अ‍ॅटिट्युड सांभाळत दोस्ती कायम राखणारे विषय या मालिकेने सुरूवातीला अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले खरे. मात्र आता मालिका सुरू ठेवण्यासाठी उगाच काहीतरी विषय दाखवायचे म्हणून ही मालिका सध्या सुरू आहे. आणि याचमुळे सुरूवातीला सर्व वयोगटातील असणाऱ्या प्रेक्षकांची संख्या आता निम्म्यावर आली आहे. यामुळे एका क्षणी आलेख उंचावलेल्या या ‘कॉमेडी’ मालिकेतील ‘निखळ विनोद’च आता हरवल्याची प्रतिक्रिया मिळत आहेत.