हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांची मनात अढळ स्थान मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता विनोद मेहरा. आपल्या छोट्याशा सिनेकारकिर्दीत विनोद मेहरा यांनी विविध सिनेमात दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यांच्या या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या. मात्र कमी वयातच विनोद मेहरा यांनी जगाचा निरोप घेतला. ३० ऑक्टोबर १९९० रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनावेळी त्यांची सोनिया मेहरा लेक अवघ्या २ वर्षांची होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनियानंसुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात एंट्री मारली.
रुपेरी पडद्यासह छोट्या पडद्यावरही सोनियाने आपली जादू दाखवली. रुपेरी पडद्यावर सोनियाचे अखेरचे,दर्शन २०१४ साली आलेल्या 'रागिनी एमएमएस-२' या सिनेमात झाले. या सिनेमात तिने तान्या कपूर ही भूमिका साकारली होती. याशिवाय एमटीव्हीवरील विविध शोमध्येसुद्धा ती झळकली आहे. एमटीव्ही ग्राइंड, एमटीव्ही न्यूज आणि एमटीव्ही स्टाइल चेक अशा शोमध्ये व्हीजे म्हणून तिने काम केले आहे. सोनियाची स्टाइल आणि अदा कुणालाही घायाळ करतील अशाच म्हणाव्या लागतील. तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज यावर रसिक फिदा आहेत.
टॅलेंट हंट स्पर्धा ते रेखासोबतचे सीक्रेट मॅरेज...वाचा, विनोद मेहरांच्या आयुष्याबद्दलच्या खास गोष्टी!!
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांच्या पतीच्या आग्रहास्तव विनोद मेहरा यांनीही या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत राजेश खन्ना यांच्यासह सुमारे दहा हजार स्पर्धक होते. या स्पर्धेत विनोद मेहरा जवळपास फायनल विनर होते. मात्र ऐनवेळी विजेता म्हणून राजेश खन्ना यांचे नाव जाहिर झाले आणि ते सुपरस्टार बनले. विनोद मेहरा या स्पधेर्चे उपविजेते ठरले. चित्रपटात येण्यापूर्वी विनोद मेहरा माकेर्टींग एक्झिक्युटीव्ह होते. एकेदिवशी निर्माताशौरी यांची नजर त्यांच्यावर गेली. त्यांनी आपल्या ‘एक थी रिता’ या चित्रपटासाठी विनोद मेहरा यांना आॅफर दिली. या चित्रपटात त्यांची हिरोईन होती,अभिनेत्री तनुजा. विनोद मेहरा यांच्या करिअरला गती देण्यात अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांचा मोठा हात आहे. ‘अनुराग’ या चित्रपटात मौसमी व विनोद यांची जोडी सर्वप्रथम पडद्यावर आली.