Join us

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! विनंता नंदा अजय देवगणवर बरसल्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:36 PM

अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ झकळणार हे स्पष्ट झाले आणि ‘मीटू’ चळवळीत आवाज बुलंद करणा-या अनेकांच्या भुवया उंचावल्या. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या विनता नंदा यांनीही यानिमित्ताने अजयवर टीकास्त्र सोडले.

ठळक मुद्दे‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले होते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज ‘मीटू’च्या वावटळीत अडकलेत होते. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले होते.

अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ झकळणार हे स्पष्ट झाले आणि ‘मीटू’ चळवळीत आवाज बुलंद करणा-या अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक महिलांनी ‘मीटू’अंतर्गत आलोक नाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. अशात अजय देवगणने आपल्या चित्रपटात आलोक नाथ यांना कास्ट करणे, अनेकांना रूचले नाही. ‘मीटू’ मोहिमेला तोंड फोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने यानिमित्ताने अजय देवगणवर सडकून टीका केली. आपली चित्रपट सृष्टी किती ढोंगी आणि खोट्या लोकांनी भरलेली आहे,हे अजयने सिद्ध केले, असे तनुश्री दत्ता म्हणाली होती. आता आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या विनता नंदा यांनीही अजयवर टीकास्त्र सोडले आहे.

एका ताज्या मुलाखतीत विनता नंदा यांनी अजयवर तीव्र शब्दांत टीका केली. मला अजयकडून अशी अपेक्षा नव्हतीच. अजय कुठलीही ठोस भूमिका घेऊ शकतो, असे मला मुळीच वाटत नाही. केवळ प्रोजेक्टमध्ये लागलेले पैसे हाच त्याचा एकमेव धर्म आहे. बॉक्स आॅफिस आणि पैसा हाच अशांचा धर्म असतो. अशात मला केवळ प्रेक्षकांकडून आशा आहे. कारण प्रेक्षक मायबाप चित्रपट नाकारू शकतात. जे लोक ठोस भूमिका घ्यायला घाबरत आहेत,अशांची झोप प्रेक्षक उडवून लावतील. प्रेक्षकांनी असे न केल्यास समाज किती क्रूर आहे, हेच सिद्ध होईल, असे विनता नंदा म्हणाल्या.

‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले होते. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज ‘मीटू’च्या वावटळीत अडकलेत होते. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले होते. निर्मात्या-लेखिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला.  ‘एका पार्टीनंतर मी एकटी घरी जात होते. आलोक नाथ यांनी मला लिफ्ट देण्याची आॅफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माझ्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे नंदा यांनी म्हटले होते. 

टॅग्स :अजय देवगणआलोकनाथ