The Kerala Story teaser Out: ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर आणखी एका अशाच चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं नाव आहे, ‘द केरला स्टोरी’. केरळ राज्यातील अतिशय संवेदनशील व ज्वलंत विषयाला वाहिलेल्या या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे आणि या टीझरनं सोशल मीडियावरचं वातावरण तापवलं आहे.केरळ राज्यातून बेपत्ता झालेल्या सुमारे 32 हजार मुली व महिलांचं नेमकं काय झालं, याची ही कथा. या चित्रपटाचा टीझर पाहून अंगावर काटा येतो. केरळच्या 32 हजारांवर मुली व महिलांची तस्करी करून त्यांना इसिस या दहशतवादी संघटनेला विकण्यात आलं, असा दावा या टीझरमध्ये करण्यात आला आहे.
टीझरमध्ये शालीनी उन्नीकृष्णन ही मुलगी आपली कथा सांगताना दिसते. माझं नाव शालीनी उन्नीकृष्णन होतं. आता मी फातिमा बा आहे. एक इसिसची दहशतवादी. मी एकटी नाहीये. माझ्यासारख्या 32 हजारांवर महिला आहे. एका सामान्य मुलीला खतरनाक अतिरेकी बनवण्याचा एक भयंकर खेळ केरळात सुरू आहे...आणि तोही खुल्लेआम...ही आहे माझी कथा.. ही आहे त्या 32 हजार महिलांची कथा.., असं ती मुलगी म्हणते. हा टीझर पाहून अंगावर काटा येतो. या चित्रपटात अदा शर्मानं ( Adah Sharma) शालिनीची भूमिका साकारली आहे.विपुल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सुदिप्ता सेन यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे.