Join us

सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी वरमाई सज्ज; मृणाल कुलकर्णीने शेअर केला सुंदर मेहंदी व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:58 IST

Mrinal kulkarni : सध्या सोशल मीडियावर मृणाल कुलकर्णीचा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत विराजस दिसत आहे.

सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे अनेक प्रसिद्ध जोड्या लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. त्यांच्यानंतर आता अभिनेता विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) आणि शिवानी रांगोळे (shivani rangole) यांचीही लग्न घटिका जवळ आली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी लग्नगाठ बांधणार असून त्यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. अलिकडेच या मेहंदी सोहळ्यातील विराजस आणि शिवानीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते. मात्र, आता वरमाईचे म्हणजेच विराजसची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal kulkarni) यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर मृणाल कुलकर्णीचा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत विराजस दिसत असून त्या त्यांची मेहंदी आपल्या मुलाला दाखवत आहेत. तसंच लवकरच सासूबाई होणार असल्याचा आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. हा व्हिडीओ कांचन मेहंदी या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच विराजस आणि शिवानीचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर या दोघांच्या लग्नाचे वेध चाहत्यांना लागले होते. अखेर या दोघांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार असून त्यांच्याकडे लग्नाची लगबग सुरु आहे. विराजस आणि शिवानी यांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :मृणाल कुलकर्णीविराजस कुलकर्णीशिवानी रांगोळेसेलिब्रिटी