Join us

विराट-अनुष्काचे पॅचअप? मुंबईत केले सिक्रेट डिनर..!

By admin | Published: April 07, 2016 10:28 AM

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे पॅचअप झाले असून दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर गेल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून या कपलमध्ये असलेला दुरावा आता संपुष्टात आला असून त्यांचे पॅचअप झाल्याचे वृत्त आहे. नुकतेच ते दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. त्यांच्या या सिक्रेट डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 
ग्रे कलरच्या टीशर्टमधील विराटचा कूल लूक आणि त्याच्यामागोमाग ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसणारी अनुष्का असा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत असून त्यांच्यात सर्व काही आलबेल असल्याचेच दर्शवत आहे. 
काही दिवसांपूर्वी अनुष्का-विराटने एकमेकांना सोशल मीडिया अकाऊंट्सवर अनफॉलो केल्याने त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू होती. तसेच विराटचा लग्नाचा प्रस्तावही अनुष्काने फेटाळल्याचे वृत्त होते. विराट आणि अनुष्काने मात्र या मुद्यावर कोणतेही स्पष्टीकरण न देता मौन राखणे पसंत केले. मात्र त्यानंतर ते कुठेही एकत्र न दिसल्याने ब्रेकअचेच वृत्त खरे असल्याची चर्चा जोर धरू लागली होती.
मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात विराटच्या उत्तम खेळींनतर अनुष्काने विराटला मेसेज करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदनही केले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच सोशल मिडियावर अनुष्काच्या नावाने सुरु असलेल्या जोक्सवरुन विराटने संताप व्यक्त करत अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा, असे म्हटले होते. ब्रेकअपनंतरही ते दोघे एकमेकांची इतकी काळजी करत असल्याची अनेक उदाहरणे समोर आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आणि अखेर आता विराट-अनुष्का पुन्हा एकत्र आले असून, त्यांची जोडी अशीच सलामत रहावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.