राहुल वैद्य हे आता छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. हा गायक 'बिग बॉस', 'लाफ्टर शेफ' सारख्या अनेक शोमध्ये दिसला आहे. त्याचा एक मोठा चाहतावर्ग आहे. तो कायम चर्चेतही असतो. अशातच आता त्यानं पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राहुल वैद्यनं भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसंदर्भात एक खुलासा केलाय. विराट कोहलीने त्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं दावा राहुल वैद्यने केला आहे.
सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये राहुल वैद्य पापाराझींशी बोलताना म्हणाला, "माहित नाही का पण विराट भाईने मला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे. मला आजपर्यंत समजलं नाही की, त्यांनी मला का ब्लॉक केलं आहे. ते भारतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहेत. पण माहित नाही का मला त्यांनी ब्लॉक केलं आहे. कदाचित काहीतरी घडलं असेल".