Virat Kohli Anushka Sharma Bengaluru: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने टी२० वर्ल्ड कपच्या आधी पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर IPL सुरू होताच त्याने RCB च्या कर्णधारपदाचाही राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं. गेला हंगाम हा त्याचा कर्णधार म्हणून शेवटचा हंगाम होता. आता या हंगामात तो फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. IPL सुरू झाल्यापासून विराट RCB शिवाय इतर कोणत्याही संघात खेळलेला नाही. गेली १४ वर्षे तो बंगळुरूच्या संघाकडूनच खेळत आहे, त्यामुळे विराटचं बंगळुरूशी खास नातं आहे. पण विराटपेक्षाही अनुष्काचं बंगळुरूशी नातं अधिक घट्ट असल्याचं विराटने सांगितलं.
दरम्यान, IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी RCB व्यवस्थापनाने विराट कोहलीला सर्वप्रथम रिटेन केलं. विराटला १५ कोटींच्या किमतीला RCBने रिटेन केलं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या RCB पॉडकास्टमध्ये विराट कोहलीने अनुष्काचा बंगळुरूशी असलेलं "खास कनेक्शन" सांगितलं.
"अनुष्का ही बंगळुरूचीच मुलगी आहे. ती तिथेच लहानाची मोठी झाली. तिने बंगळुरूमध्ये माझ्यापेक्षा जास्त वेळ घालवला आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. तिचं फार पूर्वीपासूनच बंगळुरूशी खास नातं आहे. त्यामुळे साहजिकच मी RCB साठी खेळतो, याचा तिला खूप आनंद वाटतो. तसेच, माझी या संघाशी आणि शहराशी कायमस्वरूपी बांधिलकी असेल", असं विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं.
"जेव्हा RCBचा संघ चांगलं काम करत नाही, तेव्हा तिला नक्कीच दुःख होतं. बंगळुरूशी तिचं आधीपासूनच एक विशेष नातं होतं. त्यामुळे मी RCBकडून खेळणं हा तिच्यासाठी दुग्धशर्करा योगच होता. त्यामुळे तिच्यासाठी मी RCB तून खेळणं हे एका अर्थी चांगलंच झालं. आम्ही जेव्हा बंगळुरूला जातो तेव्हा तिच्या आठवणी ताज्या होतात", असंही विराटने स्पष्ट केलं.