अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे चाहत्यांचं लाडकं कपल बऱ्याच दिवसांपासून लंडनमध्ये राहत आहे. दोघंही तिथे आपल्या मुलांसोबत सामान्य आयुष्य जगत आहेत. भारतात ते शक्य नाही म्हणून दोघं लंडनमध्ये कायमचे शिफ्ट झाल्याचीही चर्चा आहे. लंडनच्या रस्त्यावर फिरताना विराट अनुष्काचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये विराट हातात शॉपिंगची बॅग घेऊन अनुष्काच्या मागे चालताना दिसतोय.
विराट-अनुष्का या जोडीबद्दल कोणतंही अपडेट आलं की ते व्हायरल होतंच. लंडनमध्ये हे कपल भजनात रमलेले दिसले तर कधी मुलांसोबत फुलांच्या दुकानात दिसले. काही दिवसांपूर्वी विराट कोहलीचा लंडनमध्ये ट्रेनची वाट बघतानाचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता विराट अनुष्का रस्त्यावरुन फिरत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दोघांच्या हातात पिशव्या आहेत. विराट हातात शॉपिंग बॅग घेऊन अनुष्काच्या मागे चालताना दिसतोय. अगदी सामान्य लोकांसारखे ते तिकडे फिरत आहेत. विराट कोहलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरील काही पेजवर व्हिडिओ व्हायरल केले आहेत.
भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहली मुंबईत सेलिब्रेशन करुन लगेच लंडनला रवाना झाला होता. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनुष्काने लंडनमध्येच अकायला जन्म दिला. मुलांना सामान्य आयुष्य जगता यावं म्हणून दोघंही परदेशात शिफ्ट झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहते मात्र भारतात कपलची आठवण काढत आहेत. अनुष्काने अद्याप आल्या दोन्ही मुलांचा चेहरा माध्यमांसमोर दाखवलेला नाही.