Join us

यह सियासत अजीब बिल्ली है...! प्रचाराच्या रणधुमाळीत विशाल भारद्वाज यांचे ट्विट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 12:24 PM

बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज सध्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर अधिक अ‍ॅक्टिव्ह आहेत. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरचे त्यांचे अनेक राजकीय ट्विट सध्या चर्चेत आहेत.

ठळक मुद्देविशाल भारद्वाज हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ओंकारा, सात खून माफ, इश्किया, हैदर हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजलेत.

बॉलिवूड दिग्दर्शक विशाल भारद्वाज सध्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर अधिक अ‍ॅक्टिव्ह आहेत. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरचे त्यांचे अनेक राजकीय ट्विट सध्या चर्चेत आहेत. ताजे ट्विटही असेच. त्यांच्या या ट्विटवर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही तितक्याच भारी आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.‘यह बनारस नहीं दिल्ली है, उल्टी गंगा यहां पर बहती है, घर की रोटी खिलाए चूहों को, यह सियासत अजीब बिल्ली है...,’ असे ट्विट विशाल भारद्वाज यांनी केले आहे.  

यापूर्वी विशाल भारद्वाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या ‘सराब’ या शब्दावर टीप्पणी करणारे ट्विट केले होते. शिवाय ‘सराब’व ‘शराब’ या शब्दांची सरमिसळ करणा-यांना अप्रत्यक्षपणे असे न करण्याचा सल्लाही दिला होता. ‘हस्ती अपनी हबाब की सी है. ये नुमाइश सराब की सी है’ हा मीर तक्री मीर यांचा शेर शेअर करत, विशाल भारद्वाज यांनी ‘सराब को शराब न पढे’, असे लिहिले होते.

त्यांचा इशारा पंतप्रधान मोदींकडे होता. अलीकडे मोदींनी आपल्या भाषणात सपा, रालोद व बसपा या तिन्ही पक्षांवर टीका करताना या पक्षांच्या आद्यांक्षरांपासून बनवलेला ‘सराब’ हा शब्द वापरला होता. शिवाय ‘सराब’पासून दूर राहण्याचे म्हटले होते.विशाल भारद्वाज हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ओंकारा, सात खून माफ, इश्किया, हैदर हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजलेत. लहान मुलांसाठी त्यांनी मकडी, ब्लू अम्ब्रेला सारखे चित्रपट बनवलेत.

टॅग्स :विशाल भारद्वाज