सहदेव दिर्दो (Sahadev ) नावाच्या एका 10 वर्षांच्या चिमुकल्याने ‘बचपन का प्यार’ हे गाणं गायलं आणि लोक त्याच्या प्रेमात पडले. अगदी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनाही सहदेवच्या गाण्यानं वेड लावलं. अनुष्का शर्मा, रॅपर बादशाह अशा अनेकांनी सहदेवचं भरभरून कौतुक केलं. बादशाहने तर सहदेवसोबत गाणं तयार केला. हे गाणंही तुफान व्हायरल झालं. सहदेव सोशल मीडियाचा स्टार झाला. अर्थात काहींनी या चिमुकल्याही ट्रोल केलं. आता या ट्रोलर्सला संगीतकार विशाल ददलानीनं (Vishal Dadlani ) चांगलंच फैलावर घेतलंय.अनेकांना सहदेवचं गाणं आवडलं नाही. याच लोकांनी मग सहदेवला ट्रोल करायला सुरूवात केली. देशात सहदेवपेक्षाही प्रतिभावान मुलं आहे, सहदेवमध्ये काहीही खास नाही. त्याला डोक्यावर घेण्याची इतकी गरज नाही, अशा काय काय प्रतिक्रिया या ट्रोलर्सनी दिल्या. आता या ट्रोल करणा-या ट्रोलर्सवर विशाल ददलानी चांगलाच भडकलाय. सहदेवची अन्य मुलांसोबत तुलना करणा-यांना त्यांने चांगलंच सुनावलंय.
विशाल ददलानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात तो म्हणाला, ‘मी गेल्या काही दिवसांपासून अनेक व्हिडीओ पाहतोय. हा मुलगा लोकप्रिय व्हायला हवा होता. ‘बचपन का प्यार’ गाणारा मुलगा मुलाला एवढी प्रसिद्धी का? असे लोक म्हणत आहेत. ही तुलना आवश्यक आहे का? कदाचित एखादा मुलगा खूप चांगले गाऊ शकतो आणि दुसरा त्यापेक्षा थोडा कमी. एका मुलाचे गाणे लोकप्रिय झाले असेल. तर याचा अर्थ असा होत नाही की दुसरा मुलगा त्याच्यापेक्षा कमी आहे. काही मुलं चांगली गातात, काही त्यापेक्षा कमी चांगली. अशात मुलांची तुलना करणे ही मानसिकताच मुळात चुकीची आहे. दोन्ही मुलं चांगली शकत नाहीत का? दोघेही त्यांच्यापरिनं लोकांचं मनोरंजन करतात. ही लहान मुलं आहेत. त्यांचा असा अपमान करून तुम्हाला काय मिळणार आहे? यातून तुम्हाला काय मिळणार आहे? कृपया असं वागू नका.’
सोशल मीडियावर वायरल होणा-या सहदेवच्या गाण्याचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात सहदेव त्याच्या शिक्षकांसमोर ‘‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. पुन्हा एकदा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.