Join us

विक्रम गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार

By admin | Published: October 14, 2015 4:22 AM

मराठी रंगभूमीच्या क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ सुवर्णमहोत्सवी वर्षात ज्येष्ठ अभिनेते, नाटककार विक्रम गोखले यांना जाहीर झाले.

सांगली : मराठी रंगभूमीच्या क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचे समजले जाणारे ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ सुवर्णमहोत्सवी वर्षात ज्येष्ठ अभिनेते, नाटककार विक्रम गोखले यांना जाहीर झाले. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे देण्यात येणारे हे पदक रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबरला अ.भा. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा अभिनेत्री फय्याज यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी मंगळवारी दिली. गौरवपदक, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांद्वारे गोखले यांनी अभिनयाच्या प्रांतात स्वतंत्र ठसा उमटविला आहे. मराठी व हिंदी रंगभूमीवर त्यांनी सुमारे ३० नाटके सादर केली आहेत. अभिनेते चंद्रकांत गोखले यांना यापूर्वी या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता त्यांचे पुत्र विक्रम गोखले यांचाही याच पदकाने सन्मान होणार आहे.>> रंगभूमीवरील प्रतिष्ठित विष्णुदास भावे पुरस्कारास बालगंधर्वांपासून एक परंपरा आहे. राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याचा जेवढा आनंद होईल तितकाच रंगभूमीवरील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद होत आहे.- विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते