Join us  

चीटर टीमची ‘लोकमत’ला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2016 2:42 AM

हॉरर कॉमेडी असलेला ‘चीटर’ हा सिनेमा १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पुण्यातील एका अग्निहोत्री फॅमिलीमधील मुलगा कसा चीटिंग करीत असतो अन् तो आपल्या मनाप्रमाणे जगत असतानाच कुटुंबाला कसे फसवतो आणि एके दिवशी मॉरिशसला जाऊन तिथल्या गोष्टींमध्ये स्वत: कसा फसत जातो, अशी हॉरर कॉमेडी असलेला ‘चीटर’ हा सिनेमा १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नुकतीच ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या या चित्रपटातील अनेक पैलू उलगडले. चित्रपटाचे दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी सांगितले. पुण्यातील एक अग्निहोत्री फॅमिली आहे. सुसंस्कृत फॅमिलीतील मुलगा जिथे आजही वेदांचे पठण केले जाते, त्या कुटुंबाच्या पूर्ण वेगळा हा मुलगा आहे. तो दारू पित असतो, त्याला वाटते, चीटिंग करणे म्हणजेच खरे आयुष्य. मग मॉरिशसमधील एक मुलगी पुण्यात सायकॉलॉजी शिकायला येते अन् तिची जवळीक होते चीटरशी, अन् तो तिला प्रेमात पाडून सांगतो, ‘मी ठाकूर बिल्डरचा मुलगा आहे. पीएच.डी. करतोय.’ म्हणून तिच्यावर इंप्रेशन पाडतो. मग तिला मॉरिशसला घरी प्रॉब्लेम झाला, म्हणून बोलाविण्यात येते. तिच्या मदतीला हा चीटर तिकडे जातो अन् स्वत:च तयार केलेल्या जाळ््यात कसा अडकत जातो, याची कहाणी आहे चीटर. ऋषिकेश जोशी त्यांच्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाले, ‘मी या चित्रपटात मॉरिशसमधील एका मराठी माणसाची व्यक्तिरेखा साकारत आहे. मॉरिशसमधील एक मराठी माणूस असल्याने भाषेतील वेगळेपण आहे. श्रीमंत असूनदेखील तो कंजूस अन् विक्षिप्त आहे. देव-भूते यावर विश्वास नाही. आईवर नितांत प्रेम करणारा. नात्यांच्या बाबतीत प्रेमळ असा तो आहे. घरात घुसलेल्या चीटरविषयी त्याला पहिल्यापासूनच आक्षेप आहे. पूजा म्हणते, ‘चीटरमध्ये मी बऱ्याच गोष्टी केल्या, पहिल्यांदा मी कॉमेडी करतेय. माझे वडील ऋषिकेश जोशी आहेत अन् त्यांच्यासोबत मला यामध्ये सीन करायला मिळाले, शिकायला मिळाले. आतापर्यंत अभिनेत्रीला चित्रपटात जास्त वाव नसतो, पण चीटरमध्ये तुम्ही क्लायमॅक्स पाहिला, तर या सर्वच कॅरेक्टरचे कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला यात दिसेल. ऋषिकेश सरांसोबत काम करताना मजा यायची, पण दडपणही यायचे. वैभव अन् मी चांगले फ्रेंड्स आहोत, पण सीन करताना आम्ही प्रोफेशनली काम केले अन् ती केमिस्ट्री वर्क झाली.’ यात प्रत्येकाच्या भूमिकेला वाव आहे. वैभवचा टर्निंग पॉइंट चीटर असेल. >प्रत्येक सिनेमाची कॉमेडी वेगळी. ही हॉरर कॉमेडी आहे. माणसे जेवढी खरी, तेवढा तो सिनेमा प्रेक्षकांना भावतो. अजयने गोष्ट लिहिलीय, त्यामुळे त्यातून होणारे मनोरंजन कॅरेक्टरच्या बाहेर जात नाही. मॉरिशसचे शूट अन् निसर्गसौंदर्य आहे. मनोरंजनात्मक सिनेमा आहे. माझ्यासाठी नव्या गोष्टी आहेत. - ऋषिकेश जोशी (अभिनेते)>आज कथा चांगल्या येतात, पण ९० टक्के लोक टेक्निकली साउंड नाहीत, हे दुर्दैव आहे. चित्रांच्या भाषेमध्ये सांगण्याच्या कथेत भाषेचे ग्रामर येते अन् ते कॅमेऱ्याच्या पेनाने लिहावे लागते. वैविध्य येतेय, पण ते १० टक्केच. आज एका आठवड्याला पाच सिनेमे प्रदर्शित होतात. पूर्वीच्या काळी आम्ही पाच प्रिंट काढल्या, तरी खूप मोठी गोष्ट व्हायची. चित्रपटाची संख्या वाढत असल्याने खरा चित्रपट आज प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. - अजय फणसेकर ( दिग्दर्शक)