बॉलीवूड आणि टीव्हीचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झालंय. ते ७३ वर्षांचे होते. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. युसूफ हुसैन यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. यूसुफ हुसैन यांनी 'विवाह', 'धूम 2', 'खोया खोया चांद', 'क्रेजी कक्कड़ फैमिली' आणि 'रोड टू संगम' सारख्या सिनमात काम केले होते. युसूफ हुसैन यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिषेक बच्चन, मनोज बाजपेयी, पूजा भट्ट यासरखे अनेक सेलिब्रेटींनी ट्वीट करत श्रध्दांजली वाहिली आहे.
हंसल मेहता यांनीच सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची बातमी दिली. 'मी आज खरोखरच अनाथ झालो आहे असे म्हणत त्यांनी दुःख व्यक्त केलंय. हंसल मेहता यांनी ट्विट करत म्हटले की,'मी 'शाहिद'चे 2 शेड्युल पूर्ण केले होते आणि त्यावेळी मी प्रचंड आर्थिक अडचणीत होतो. फिल्ममेकर म्हणून माझी कारकीर्द संपण्याच्या वाटेवर होती. तेवढ्यात मला खरा आधार दिला तो युसूफ हुसैन यांनीच. माझ्या पडत्या काळाच त्यांनी आधार दिला नसता तर आज माझं करिअर संपलं असते. त्यांनी जमा केलेले पैसे मला दिले आणि तुमच्या अडचणीत हे पैसे कामी आले नाहीत तर पैस्यांचा काही उपयोग नाही असे सांगत त्यांनी मला आर्थिक मदत केली. माझी आर्थिक अडचण दूर केली आणि 'शाहिद' सिनेमा पूर्ण झाला होता.
वडिलांसारखे नेहमी सतत पाठीशी असायचे. जेव्हा जेव्हा गरज पडली त्यांनी साथ दिली. केवळ चांगले सासरेच नव्हते तर वडिलांप्रमाणे सतत मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्या निधनाने आज अनाथ झाल्याची भावना हंसल मेहता यांनी व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. युसूफ हुसैन यांची मुलगी सफीनाचे लग्न हंसल मेहता बरोबर झाले आहे.
यूसुफ हुसैन यांनी केले होते तीन लग्न
यूसुफ हुसैन यांनी 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, माझे तीन लग्न झालीयेत. पण आजही मी समजूतदार पार्टनरच्या शोधात आहे. आता माझे वयसुद्धा 60 वर्ष आहे. त्यामुळे चांगल्या पार्टनरचा शोध कदाचित या जन्मात तरी पूर्ण होणार नाही.