प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर समाजमाध्यमांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत होत्या. आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’बाबत नसिरुद्दीन शहांनी केलेल्या वक्तव्यावर अग्निहोत्रींनी संताप व्यक्त केला आहे.
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात अग्निहोत्रींनी नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “मी त्यांचा चाहता आहे आणि म्हणूनच मी त्यांना माझ्या द ताश्कंद फाइल्स चित्रपटातही घेतलं होतं. पण मला आश्चर्य वाटतंय की नसिरुद्दीन सर एवढे म्हातारे कसे झाले? आणि जर हे वक्तव्य त्यांनी वाढत्या वयामुळे केलं असेल, तर मला याबाबत काहीच म्हणायचं नाही. कधी कधी लोक निराश असतात. किंवा कदाचित त्यांना काश्मीर फाइल्सचं सत्य माहीत असावं.”
‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”
पुढे ते म्हणाले, “नसिरुद्दीन सर नरसंहाराचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांत काम करून खूश आहेत. त्यांनी त्यांच्या धर्मामुळे किंवा निराश असल्यामुळे अशा चित्रपटांत काम केलं आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना दहशतवाद्यांचं समर्थन करायचं आहे. पण, मी असा नाही.” नसिरुद्दीन शाह काय म्हणतात याने मला फरक पडत नाही, असंही पुढे अग्निहोत्री म्हणाले.
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनींचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “ते अमेरिकेला...”
काय म्हणाले होते नसिरुद्दीन शाह?
“गदर 2 आणि द केरळ स्टोरी सारखे चित्रपट जे मी अजून पाहिले नाहीत पण मला माहित आहे की ते कशाबद्दल आहेत. मला आश्चर्य वाटतं की काश्मीर फाईल्स सारखे सिनेमे हिट होतात पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांनी बनवलेले सिनेमे जे सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याकडे कोणीच बघत नाही. असे फिल्ममेकर निराश होत नाहीत आणि सत्य गोष्टी दाखवत राहतात. १०० वर्षांनंतर लोक 'भीड' आणि 'गदर 2' बघतील तेव्हा त्यांना समजेल की कोणता चित्रपट सत्य दाखवत होता. कारण चित्रपट हे सत्य दाखवण्याचं सक्षम माध्यम आहे.”