Kashmir Files IffI: गोवा येथे सुरु असणाऱ्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काल काश्मीर फाईल्स सिनेमाबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. इफ्फीचे ज्युरी हेड नादिव लॅपिड यांच्या वक्तव्याने ही खळबळ माजली आहे. इस्राइलचे नादिव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्सचा उल्लेख 'प्रपोगंडा आणि वल्गर' असा केल्याने काश्मीर फाईल्सचे कलाकार भडकले आहेत.
नादिव यांच्या वक्तव्यावर काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी ट्विट केले आहे. 'सत्य अधिक धोकादायक असतं. लोकांना खोटं बोलायलाही भाग पाडतं. #creativeconsiousness' अशा शब्दात विवेक अग्निहोत्री यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
तर काश्मीर फाईल्स मधील अभिनेते अनुपम खेर यांनी चित्रपटातील काही फोटोज आणि १९९३ ची अमेरिकन फिल्म शिंडलर्स लिस्ट ची फोटो शेअर करत दोन ओळी ट्विट केल्या आहेत. 'झूट का कद कितना भी ऊॅंचा क्यो ना हो...सत्य के मुकाबले मे हमेशा छोटा ही होता है' असे म्हणले आहे.
नादिव लॅपिड काय म्हणाले ?'काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे आपण सगळेच धक्क्यात आहोत. हा सिनेमा आम्हाला दुष्प्रचार करणारा वाटला. एवढ्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा समावेश असणे योग्य नाही. मी माझे म्हणणे या मंचावर खुलेपणाने मांडु शकतो, यामुळे अशा विषयांवर चर्चाही होईल असे मला वाटते. '