Join us

'द व्हॅक्सिन वॉर'च्या कलेक्शनवर विवेक अग्निहोत्री म्हणाले - 'भगवद्गीता आणि प्लेबॉय मासिक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 13:33 IST

‘द व्हॅक्सिन वॉर’ ला बॉक्स ऑफिसवर फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही.

‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट 28 सप्टेंबर रोजी सर्वत्र झाला. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचं कथानक कोरोना काळ आणि लस यावर आधारित आहे. विवेक अग्निहोत्रीच्या ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियरही झाला होता. पण चित्रपटगृहात या चित्रपटाला प्रेक्षक मिळत नाहीयेत. आता चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे. यावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

विवेक अग्निहोत्री एका मुलाखतीमध्ये म्हणाले की, "थिएटरबाहेर पडल्यानंतर एकाही प्रेक्षकाने चित्रपटाबद्दल नकारात्मक कमेंट केली नाही. तसेच जितके लोक प्लेबॉय मासिक विकत घेतात, तितकेच लोक गीता देखील विकत घेत नाहीत.  जगाचे वास्तव पूर्णपणे वेगळे आहे".

'द वॅक्सीन वॉर' बॉक्स ऑफिसवर 'फुक्रे 3' आणि 'चंद्रमुखी 2' या दोन चित्रपटांशी स्पर्धा करत आहे. याआधीही 'जवान' आणि 'गदर 2' सारखे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटांच्या शर्यतीत 'द व्हॅक्सिन वॉर' खूप मागे पडले आहे.  व्हॅक्सीन वॉरला दहा कोटींपर्यत पोहचण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागत आहे. सोमवारपर्यत या चित्रपटानं पाच कोटींचा आकडा पार केलेला नाही.

विवेक अग्निहोत्रीची पत्नी आणि 'द व्हॅक्सिन वॉर'ची निर्माती पल्लवी जोशी यांनी अलीकडेच सांगितले होते की, 'सर्व लोक आत्मसंतुष्ट आहेत. पण हा चित्रपट कोविडवर आधारित नाही. चित्रपटात फक्त लस कशी बनवली गेली आणि कोविड महामारीच्या काळात कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागले हे दाखवले आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, पल्लवी जोशी आणि रायमा सेनसारखे स्टार्स दिसणार आहेत.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यानाना पाटेकर