Join us

Brahmastraमुळे थिएटरर्सचं झालं 800 कोटींचं नुकसान?, Vivek Agnihotri म्हणाले- बॉलिवूडचा पर्दाफाश...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 12:40 PM

रणबीर आलिया भट स्टारर 'ब्रह्मास्त्र'चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी याला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमाबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं आहे.

रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt)  स्टारर चित्रपट 'ब्रह्मास्त्र' थिएटरमध्ये रिलीज  झाला आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांनी याला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये पोहोचत आहेत. 'ब्रह्मास्त्र'च्या चर्चा खूप दिवसांपासून आहे. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी सिनेमाबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. 

'ब्रह्मास्त्र'साठी खराब रिव्ह्यूमुळे थिएटर चेन PVR आणि INOX ला मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अयान मुखर्जीचा हा चित्रपट 410 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. या चित्रपटामुळे दोन्ही थिएटर चेनचे 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच गोष्टी शेअर करत विवेक अग्निहोत्रीने ट्विट केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ''समस्या ही आहे की बॉलीवूडमध्ये फक्त शोबाजी चालते आणि यासाठी कोणीही जबाबदार नाही. कोणताही उद्योग, जो R&D मध्ये 0% गुंतवणूक करतो आणि कलाकारांवर 70-80% पैसा वाया घालवतो, तो टिकू शकत नाही.''

दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. यात तो शिवाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, साहजिकच तितकीच तगडी फी सुद्धा वसूल केली. एका रिपोर्टनुसार, रणबीरने या चित्रपटासाठी 20 ते 25 कोटी रूपये मानधन घेतलं. अगदी आलिया भटच्या दुप्पट. रणबीरच्या अपोझिट आलिया भट आहे. या चित्रपटासाठी आलियाने 10 ते 12 कोटी रूपये घेतल्याचं कळतंय.

महानायक अमिताभ बच्चन हे या चित्रपटात गुरूच्या भूमिकेत आहेत. अमिताभ यांनी 8 ते 10 कोटींमध्ये हा सिनेमा साईन केल्याचं कळतंय. साऊथ स्टार नागार्जुन याचीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याने चित्रपटातील भूमिकेसाठी 9 ते 11 कोटी रुपये घेतले आहे. 

 

टॅग्स :ब्रह्मास्त्रविवेक रंजन अग्निहोत्रीरणबीर कपूर