Join us  

“प्रत्येक गोष्ट खोटी होती, लोकांना मूर्ख बनवलं गेलं”, ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर विवेक अग्निहोत्री स्पष्टचं बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 2:19 PM

Vivek Agnihotri : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर मोठं विधान केलं आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी व निर्माता करण जोहर यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे...

आमिर खानचालाल सिंग चड्ढा’ ( Laal Singh Chaddha) या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप शो झाला. आमिरचा सिनेमा इतका दणकून आपटला, यावर बॉलिवूडच्या अनेकांनी आपलं मत दिलं आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर मोठं विधान केलं आहे.  ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी व निर्माता करण जोहर यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे.

म्हणून आपटला आमिरचा सिनेमा?आमिरचा सिनेमा मोदींच्या भक्तांमुळे आपटला, असं म्हटलं जात आहे. यावर विवेक अग्निहोत्री बोलले. ते म्हणाले, ‘मोदी भक्तांमुळे आमिरचा सिनेमा आपटला, असं काही लोक म्हणत आहे. पण भारतात नरेंद्र मोदींना किती टक्के मतं मिळालीत तर केवळ 40 टक्के.  या 40 टक्के लोकांनी आमिरच्या सिनेमाला विरोध केला, असं मानलं तरी मग उरलेले 50 टक्के लोक कुठे गेलेत? बायकॉट ट्रेंड चालला तरी आमिरचे सच्चे भक्त सिनेमा पाहायला का आले नाही? आमिरचे फॅन्स त्याच्याप्रती प्रामाणिक नसतील तर त्याने चित्रपटासाठी 100- 150 कोटी मानधन घ्यायलाच नको. तुमच्याकडे तुमचे लॉयल फॅन्स नाहीत याचा अर्थ प्रत्येक गोष्ट खोटी, फ्रॉड होती. तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात. तुम्ही 100-150 कोटी फी घेताच कसे? दंगल व पद्मावत या दोन्ही सिनेमांना विरोध झाला होता. याऊपरही हे सिनेमे चालले. आमिरचा दंगल चालला कारण प्रेक्षकांना आमिरचा सच्चेपणा दिसला होता. आमिरने पित्याच्या भूमिकेसाठी वजन वाढवले होते, तरीही लोकांनी हा सिनेमा पाहिला. पण लाल सिंग चड्ढा कशाबद्दल आहे? कोणालाच हे माहित नाही, असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.

करण, अयान मुखर्जीवरही साधला निशाणाएका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा निर्माता करण जोहर व दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्यावरही निशाणा साधला. मेकर्सला ब्रह्मास्त्रचा अर्थ ही ठाऊक नसेल आणि तेच आता यावरचा सिनेमा काढत आहेत. अयान मुखर्जीला तर ब्रह्मास्त्र हा शब्द देखील उच्चारता येत नाही. अयान चांगला दिग्दर्शक आहे. त्याचे वेक अप सिड व ये जवानी है दीवानी हे सिनेमे मला आवडले होते. पण आता ब्रह्मास्त्र येणार म्हटल्यावर मी चिंतीत आहे. जशी आईला मुलाची चिंता होते, तशी. करण जोहरसारखे लोक एलजीबीटीक्यू कम्युनिटीच्या हक्कांबद्दल बोलतात आणि नंतर आपल्याच सिनेमा या कम्युनिटीची खिल्ली उडवतात, असे ते म्हणाले.

टॅग्स :विवेक रंजन अग्निहोत्रीलाल सिंग चड्ढाआमिर खानकरण जोहरभ्रामेशानंद महाराज