विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi), सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या तिघांमधलं भांडण कोणापासून लपून राहिलेलं नाही. सलमान खानने विवेक ओबेरॉयचं करिअर खराब केल्याचा आरोपही झाला. तर दुसरीकडे विवेक-ऐश्वर्याचं नातंही खराब झालं. आता बऱ्याच वर्षांनी विवेक ओबेरॉयने सलमान आणि ऐश्वर्यावर वक्तव्य केलं आहे. टॉक्झिक रिलेशनशिपमधून कसा बाहेर निघाला यावर तो बोलला आहे.
विवेक ओबेरॉयने डॉ जय मदान यांच्या युट्यूब चॅनलवर हजेरी लावली. तो म्हणाला, "जर मला माझ्या आयुष्याचं ध्येय माहित नसतं तर मीही प्लास्टिकच्या हसऱ्या चेहऱ्याच्या लोकांमध्ये प्लास्टिकचंच जीवन जगत असतो. कदाचित मी एक विचित्र माणूस बनलो असतो आणि तसंच आयुष्य जगत असतो. प्लास्टिक हसऱ्या चेहऱ्याच्या लोकांमध्ये मीही प्लास्टिकच झालो असतो. आता जर लोक मला ट्रोल करत असतील तर मला काही फरक पडत नाही. कारण मला माझ्या जगण्याचा उद्देश समजला आहे. माझ्यासाठी सर्वात आवश्यक काय आहे हे मला कळलं आहे."
काही लोकांचं नाव घेऊन विवेकला एका शब्दात त्यांचं वर्णन करायला सांगितलं गेलं. सलमान आणि ऐश्वर्याचं नाव घेताच तो म्हणाला, 'देव त्यांचं भलं करो.' तर अभिषेक बच्चनचं नाव घेताच म्हणाला, 'स्वीटहार्ट. खूप चांगला माणूस.'
विवेक ओबेरॉय सध्या बिझनेसच्या जगात मोठं नाव आहे. नेवर्थच्या बाबतीत त्याने अनेक आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकलं आहे. विवेक १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे. तसंच तो सध्या कुटुंबासोबत दुबई येथे वास्तव्यास आहे.