Join us
Daily Top 2Weekly Top 5

"ऐश्वर्या आणि त्याच्या नात्याबद्दल मला माहीतच नव्हतं", विवेक ओबेरॉयच्या वडिलांचा खुलासा, म्हणाले, "मी त्याला अगोदरच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 18:56 IST

सुरेश ओबेरॉय यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबाबत भाष्य केलं.

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय करिअरबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. विवेक आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये होते. पण, काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप झालं. बॉलिवूडमधील गाजलेल्या अफेअरपैकी विवेक आणि ऐश्वर्या यांचं अफेअर एक आहे. पण, लेकाच्या या अफेअरबद्दल माहीतच नसल्याचा खुलासा विवेकचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' या सिनेमामुळे सुरेश ओबेरॉय चर्चेत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.  सुरेश ओबेरॉय यांनी नुकतीच लेहरेनला दिलेल्या मुलाखतीत विवेक-ऐश्वर्याच्या नात्याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, "बऱ्याच गोष्टी मला माहीत नाहीत. मला विवेकने याबाबत काहीच सांगितलं नाही. राम गोपाल वर्मा यांनी मला याबाबत सांगितलं. त्यांच्याआधी कोणाकडून तरी मला या गोष्टीबाबत समजलं होतं. मी त्याला असं करू नकोस असं सांगितलं होतं." 

ऐश्वर्याला डेट करत असल्यामुळे सलमान खानकडून धमक्या मिळाल्याचं विवेकने मुलाखतीत सांगितलं होतं. सुरेश ओबेरॉय यांनी या मुलाखतीत सलमान आणि सलीम खान यांच्याबरोबरच्या नात्याबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, "जेव्हा सलमान मला भेटतो तेव्हा तो सिगारेट लपवतो आणि माझ्याशी आदरपूर्वक बोलतो. सलीम यांचे आशीर्वाद घ्यायचं मी नेहमीच विवेकला सांगत आलो आहे. मीदेखील त्यांचा आदर करतो. काही गोष्टी घडल्या पण त्यामुळे आमच्यामधील नात्यावर परिणाम झाला नाही." 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयऐश्वर्या राय बच्चन