Join us

आता आणखीन एका पंतप्रधान यांच्या जीवनावरील सिनेमा रूपेरी पडद्यावर,विवेक ओबराॅय साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 6:15 PM

'मेरी कोम' सिनेमाचा दिग्दर्शक उमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बॉलीवुडमध्ये आजवर विविध बायोपिक आले आहे. या बायोपिक सिनेमातून त्या त्या व्यक्तीचा जीवन संघर्ष रसिकांनी रुपेरी पडद्यावर पाहिला. या बायोपिक सिनेमांना रसिकांनीही डोक्यावर घेतलं आहे. गेल्याच आठवड्यात  माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील  ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ बायोपिकचा ट्रेलर समोर आला. या सिनेमाच्या ट्रेलरवरून राजकीय वाद आणि चर्चा रंगु लागल्या आहेत. तर  त्याच्या एक दिवस आधी दिवंगत शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाॅन्च झाला. या दोन राजकीय नेत्यांवरील सिनेमा पाठोपाठ आता आणखीन एका बड्या राजकीय नेत्याच्या बायोपिक येण्याची चर्चा सुरू झाली आहे. हा राजकीय नेता दुसरा तिसरा कोणी नसून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. विशेष म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबोरॉय मोदींच्या तरुणपणीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच सिनेमात परेश रावल देखील मोदींच्या भूमिकेत झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 'मेरी कोम' सिनेमाचा दिग्दर्शक उमंग कुमार या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तुर्तास मोदी यांच्या जीवनावरील बयोपिक विषयी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोदी यांचा जीवन संघर्ष रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी  रसिकांना सिनेमाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. 

टॅग्स :विवेक ऑबेरॉयपरेश रावल