बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे. एका ताज्या मुलाखतीत तो यावर बोलला.ना माझा भाजपाशी काही संबध आहे, ना माझ्या चित्रपटाचा भाजपाशी संबंध आहे. मी अनेकदा हे सांगितले आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटासाठी भाजपाने कुठल्याही प्रकारे फंडिंग केलेले नाही. हा चित्रपट बनवण्यामागे आमचा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. असे असते तर खासदारकीचे तिकिट मी लगेच स्वीकारले असते. मला एकदा नाही तर पाचवेळा लोकसभेचे तिकिट ऑफर केले गेले. पण मी त्यास नकार दिला. कारण मी एक कलाकार आहे. राजकारण माझे काम नाहीच, असे विवेकने स्पष्ट केले.
काय म्हणता? विवेक ओबेरॉयला पाचवेळा ऑफर केले गेले लोकसभेचे तिकिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 11:05 AM
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. खरे तर विवेकने ‘पीएम नरेंद्र मोदी’ साईन केला आणि तो भाजपाशी संबंधित आहे, अशी चर्चा सुरू झाली. पण तूर्तास तरी असे काहीही नसल्याचा खुलासा विवेकने केला आहे.
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात आली आहे.