मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सातत्याने त्याच्या वेगवेगळ्या भूमिकेसाठी सिनेसृष्टीत चर्चेत राहिला आहे. कंपनी, साथियासारख्या शानदार सिनेमांनी विवेकच्या करिअरमध्ये जबरदस्त वळण मिळालं. मात्र या कारकिर्दीत असेही क्षण आले जेव्हा विवेक ओबेरॉय रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झाला. करिअरच्या या वळणावर आलेल्या चढ-उतारात सगळं काही संपवण्याचा विचारही विवेकच्या मनात आला. विवेकच्या जीवनातील हा कठीण प्रसंग आता उघडपणे समोर आला आहे.
एककाळ होता जेव्हा विवेक ओबेरॉय चॉकलेट बॉयच्या रुपानं त्याच्या चाहत्याच्या मनात अधिराज्य करत होता. विवेकनं यशाची उंची गाठण्यापूर्वीचा काळ खूप वेदनादायी होता. बॉलिवूड बबलसोबत केलेल्या संवादात विवेकनं आयुष्यातील त्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे जेव्हा सर्वकाही संपलं होतं. विवेकनं काही शॉकिंग खुलासेही मुलाखतीत केले आहेत.
वडिलांची ओळख लपवायचाया मुलाखतीत विवेक ओबेरॉयनं सांगितले की, जवळपास दीड वर्ष माझ्याकडे कोणतेही काम नव्हते अशा दिवसांनाही मला सामोरे जावे लागले आहे. जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो तेव्हा मी बॉलीवूड अभिनेता सुरेश रॉयचा मुलगा असल्याचं सांगत नव्हतो. त्या काळात माझ्या मनात अनेक वाईट विचार आले होते. एकदा तर मी हे सगळं संपवण्याचा विचार केला होता असंही विवेक म्हणाला. आसपासच्या नकारात्मक वातावरणामुळे मी त्रस्त होतो. कदाचित हाच अजेंडा असावा आणि असे अजेंडे कधी कधी आपल्याला आतून कोलमडून टाकतात. त्या काळात माझी पत्नी प्रियंका माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती आणि तिच्यामुळे मी स्वत:ला ओळखू शकलो. सर्व काही संपवण्याचा अर्थ खूप खोल आहे आणि म्हणूनच सुशांत सिंह राजपूत किंवा इतर कलाकार ज्या वेदना सहन करत आहेत ते मला जाणवू शकते असंही विवेकनं म्हटलं.
हे दु:ख विसरण्याची हिंमत आईनं दिलीआयुष्यातील हे दुःख विसरून पुढे जाण्याचे धैर्य आईकडून मिळाले. माझ्या आईने मला काही कॅन्सरग्रस्त मुलांशी भेट करून दिली. ज्यांना पाहून मला पुढे जाण्याचे धैर्य मिळाले असंही विवेकनं भावूक होत सांगितले. अलीकडेच विवेक ओबेरॉय सुनील शेट्टीसोबत धारावी बँक या चित्रपटाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे.