बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. होय, सध्या विवेक ‘पीएम नरेंद्र मोदी’या बायोपिकचे आक्रमक प्रमोशन करतोय आणि याचमुळे त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. धमकींचे फोन आल्यानंतर विवेकने पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर पोलिसांनी विवेकच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन सेलनेही गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर विवेकला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
विवेकने ट्वीट केलेल्या मीम्समध्ये तीन फोटो होते. यातील पहिल्या सर्वात वरच्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या राय होते. या फोटोला ‘ओपिनियन पोल’ असे कॅप्शन देण्यात आले आहे होते. दुसºया फोटोत ऐश्वर्या विवेक ओबेरॉयसोबत होते. याला‘एक्झिट पोल’ असे लिहिलेले होते. तिसºया फोटोत ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन व आराध्याचा फोटो होता आणि यावर ‘रिझल्ट’ असे लिहिले होते. यावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर विवेकला माफी मागावी लागली होती.