तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित थलाइवी सिनेमाच्या ट्रेलर रिलीज करण्यात आला होता आणि ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडेच रसिकांचे लक्ष लागले होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित झाले. कोरोनामुळे कंगना राणौतचा बुहप्रतिक्षित सिनेमा 'थलायवी'लाही प्रदर्शनासाठी अडकला होता. सिनेमाच्या रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली होती.
आता थलाइवी सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. थलाइवी 10 सप्टेंबरला चित्रपटगृहात झळकणार आहे. कंगना रनौतनं तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. सिनेमा जयललिता यांच्यावर आधारित असल्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवरील जयललिता यांच्या लूकशी साधर्म्य साधणारा मेकअपही कंगणाने केला होता. तिच्या लूकचीही चर्चा रंगली होती. त्यामुळे जयललिता यांच्या रुपात कंगणाला पाहणे रंजक असणार आहे.
यासोबतच तिनं चित्रपटाचं एक पोस्टरही शेअर केलं आहे. पोस्टरवर अभिनेता अरविंद स्वामी देखील दिसत आहेत. सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. जयललिता यांचा एमजीआर यांच्यासोबतचा पहिला सिनेमा 'आइराथिल ओरुवन' होता.थलाइवी तामिळ, हिंदी आणि तेलुगु भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.जयललिता यांना राजकारणात आणण्यातही एमजीआर यांची महत्वाची भूमिका होती.
या सिनेमासाठी कंगनानेही खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली आहे. विशेष म्हणजे जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाने 24 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. कंगाना सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हा पासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार म्हटल्यावर आणखी उत्सुकता वाढली असणार हे मात्र नक्की.