Join us

सारेगमपा या कार्यक्रमात हा गायक दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 5:12 PM

‘झी टीव्ही’वर सर्वाधिक काळ चाललेल्या गाण्याच्या क्षेत्रातील गुणवान होतकरू गायकांचा शोध घेणारा सा रे ग म पा हा कार्यक्रम पुन्हा परतणार आहे. त्यामुळे आपल्या आवाजाला जगापुढे सादर करण्याची आणि संगीताच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची आणखी एक संधी होतकरू गायकांसाठी उपलब्ध झाली आहे.

‘सा रे ग म पा लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमाच्या प्रचंड यशानंतर ‘झी टीव्ही’वर सर्वाधिक काळ चाललेल्या गाण्याच्या क्षेत्रातील गुणवान होतकरू गायकांचा शोध घेणारा सा रे ग म पा हा कार्यक्रम पुन्हा परतणार आहे. त्यामुळे आपल्या आवाजाला जगापुढे सादर करण्याची आणि संगीताच्या क्षेत्रात कारकीर्द करण्याची आणखी एक संधी होतकरू गायकांसाठी उपलब्ध झाली आहे. आज पार्श्वगायनाच्या क्षेत्रात नामवंत असलेले श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, कमाल खान, अमानत अली, राजा हसन, संजीवनी आणि बेला शेंडे हे आणि यासारखे अनेक गायक-गायिका या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच जगापुढे आले होते.

या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनमध्ये संगीतकार वाजिद खान हा परीक्षकाची भूमिका बजावणार आहे. वाजिद खान हा सारेगमपा या कार्यक्रमाशी पूर्वीपासून निगडित असून त्याने पूर्वीही या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम पाहिले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे गायन सुधारण्यासाठी तो त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे. ‘सा रे ग म पा’ कार्यक्रमाशी असलेल्या आपल्या संबंधांबद्दल वाजिद खान सांगतो, “सा रे ग म पा कार्यक्रमाच्या आगामी भागात मला सहभागी होता येणार आहे, या कल्पनेनेच मी खुश झालो आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या गाण्याचे परीक्षण करण्याशी माझा जुना संबंध आहे. मी यापूर्वी तीनवेळा- साजिदबरोबर या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम केले आहे. मात्र यंदा मी कार्यक्रमात एकटा असणार आहे. त्यामुळे मी नक्कीच साजिदला मिस करणार आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांची गुणवत्ता फारच उच्च आहे, कारण या कार्यक्रमाची टीम देशभरातील फक्त उत्कृष्ट होतकरू गायकांचीच स्पर्धक म्हणून निवड करतात. होतकरू गायकांना हा कार्यक्रम म्हणजे एक मोठे व्यासपीठ लाभलं आहे. संगीताच्या क्षेत्रात दरवर्षी बदल होत असून कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या गायनकलेचं कौशल्य अधिक सफाईदार करण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. यंदा या कार्यक्रमात माझ्या जोडीला परीक्षक म्हणून शेखर रावजियानी आणि सोना मोहपात्रा हे दोघे असणार आहेत. मला त्यांच्याकडूनही बरंच काही शिकता येईल.

टॅग्स :वाजिद