सई ताम्हणकर फॅमिली कट्टा या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात सईने खूप वेगळी भूमिका साकारली आहे. याच चित्रपटाविषयी सईने ‘लोकमत सीएनएक्स’शी मनमोकळ्या गप्पा मारून या भूमिकेबद्दल अनेक गोष्टींचा उलगडा केला.फॅमिली कट्टा या चित्रपटात तू वेगळी भूमिका साकारली आहेस, त्याबद्दल काय सांगशील?ल्ल खर सांगू का मी वेगळं असं काही केले नाही आहे. मला जे उमगलं ते मी करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटात माझा छोटा रोल जरी असला तरी तो फार सशक्त आहे. एखाद्या चित्रपटात जेव्हा तुमची भूमिका लहान असते तेव्हा कमी वेळात तुम्हाला तुमचा मोलाचा संदेश देण्याच आव्हान तुमच्यासमोर असते. ही भूमिका साकारताना मला माझ्या बाबांची आठवण झाली. ही भूमिका करण्यासाठी मला वंदनामावशीने संधी दिली, त्याबद्दल मी तिचे आभार मानेन. कुटुंबातील संवाद सध्या हरवत चालला आहे, याबद्दल तुला काय वाटते?ल्ल आताची पिढी फारच सुपरफास्ट आहे. तसेच जगण्याचा वेगही आता वाढला आहे. यामध्ये दोष हा कोणाचाच नाही आहे. यावर मार्ग काढायचा असेल तर सर्वांत सोपा पर्याय म्हणजे घरातील लोकांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. घरामध्ये जर आजी-आजोबा असतील तर त्या घरातील मुलांवर चांगले संस्कार होतात. तसेच कुटुंबातील माणसे दूर जरी राहत असतील तरी त्यांनी सुखाने राहावे, असं मला वाटत आहे. तू प्रेक्षकांना मालिकांमध्ये दिसणार आहेस का?ल्ल सध्या तरी मी मालिकांचा बिलकूलच विचार केला नाही. मी आता चित्रपट करण्यामध्येच जास्त कम्फर्टेबल आहे. कारण चित्रपटांचे काही दिवसांचे शूटिंग शेड्युल्ड ठरलेले असते. त्यानंतर प्रमोशन आणि मग चित्रपट प्रदर्शित होतो. हा फॉरमॅट आता सवयीचा झाला आहे. परंतु मालिकांसाठी तुम्हाला ठराविक वेळ द्यावा लागतो. रोज शूटिंगला जावे लागते. या सर्व गोष्टींसाठी माझी आता तरी मानसिक तयारी नसल्याने मी एवढ्यात तरी मालिका करणार नाही. रंगभूमीवर अनेक कलाकार दिसत आहेत, तू नाटकात काम करणार का?ल्ल मला नाटकात काम करायला नक्कीच आवडेल. परंतु माझी कायापालट करणारे नाटक त्यासाठी मला पाहिजे आहे. ज्या नाटकामुळे माझ्यातून काहीतरी वेगळा अभिनय बाहेर येईल, अशा भूमिकेच्या मी प्रतीक्षेत आहे. एवढेच नाही तर नाटकाला पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मी उगाचच करायचे म्हणून करणार नाही तर अगदी शंभर टक्के देऊन रंगभूमीवर उतरेन. त्यासाठी मी चांगल्या कथेची वाट पाहतेय.हिंदी चित्रपटामध्ये तू पुन्हा कधी पाहायला मिळणार?ल्ल मला हिंदीच काय तर कोणत्याही भाषेतील चित्रपट करण्याची काही घाई नाही आहे. मी चांगल्या भूमिकेची नेहमीच वाट पाहते. माझी भूमिका लहान असली तरी ती दर्जेदार असली पाहिजे, असे मला वाटते. मी नेहमीच चांगल्या भूमिकांसाठी थांबलेले आहे. मला प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील, अशाच भूमिका करायच्या आहेत.
कायापालट करणारे नाटक करायचे आहे
By admin | Published: October 09, 2016 3:52 AM