अभिनेता हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 2 मिनिट 25 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन असून काही तासांतच हा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झालाय. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या सिनेमात टायगर आणि हृतिक गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. पण पुढे टायगर हृतिकच्या विरोधात जातो आणि सुरु होते ते ‘वॉर’. टायगर आपल्या गुरूच्याच विरोधात का जातो आणि या वॉरचा शेवट काय होतो, याविषयीची उत्सुकता या ट्रेलरमुळे आता ताणली गेली आहे.
War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 11:43 IST
War Movie Trailer : 2 मिनिट 25 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन असून काही तासांतच हा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झालाय.
War Movie Trailer : जबरदस्त! पाहा, हृतिक व टायगरच्या ‘वॉर’चा ट्रेलर
ठळक मुद्देगांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.