राखी सावंत (Rakhi Sawant ) तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. गेल्या काही महिन्यांपासून राखी व आदिलचीच चर्चा आहे. होय, राखी सावंत दुबईचा बिझनेसमॅन आदिल खान दुर्रानीला (Adil Khan Durrani ) डेट करतेय. सध्या दोघांचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात राखी आदिलला फुल देऊन लग्नासाठी प्रपोज करतेय. राखीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्यात. पण पुढे जे काही झालं ते पाहणं इंटरेस्टिंग आहे.
व्हिडीओत राखी गुडघ्यावर बसून आदिलला लग्नासाठी प्रपोज करते. आदिल, तू माझ्याशी लग्न करशील? असं ती विचारते. पण आदिल याचं उत्तर देत नाही. मग काय? ला मेरे फूल वापर दे, असं म्हणत राखी त्याच्याकडून पुष्पगुच्छ परत घेताना दिसते. यानंतर आदिल तिला प्रेमाने मिठी मारतो.
याआधीही अनेकदा आदिल व राखीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण दोघंही एकमेकांच्या प्रेमात आहेत, यावर अद्यापही लोकांचा विश्वास नाही. केवळ चर्चेत राहण्यासाठी दोघं रिलेशनशिपचं नाटक करत असल्याचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता यात किती सत्यता आहे, ते लवकर कळेलच.
तूर्तास या व्हिडीओवरून राखी जबरदस्त ट्रोल होतेय. अर्थात काहींनी तिला सपोर्टही केला आहे. काहीही म्हणा पण मनानं राखी वाईट नाही, असं एका युजरने लिहिलं आहे. तर एकाने हिचा ड्रामा कधीच संपणार नाही, म्हणत तिला ट्रोल केलं आहे. तो लग्न करणार नाही, उगाच त्याच्यासाठी गुडघ्यावर बसू नकोस, असा सल्लाही अनेकांनी तिला दिला आहे.
याआधी राखीच्या लग्नाचा ड्रामा रंगला होता. मी रितेशसोबत लग्न केल्याचं राखीने जगाला ओरडून ओरडून सांगितलं होतं. पण अनेक महिने हा रितेश कोण, कुठला हे कुणालाच ठाऊक नव्हतं. अखेर ‘बिग बॉस 15’मध्ये त्याचं दर्शन झालं. राखीसोबत रितेश बिग बॉसच्या घरात गेला. पण बिग बॉसच्या घरात इतकी भांडणं झाली की, घराबाहेर येताच दोघांचा चॅप्टर क्लोज झाला. आता राखी रितेशचं नावही घेत नाही. आता तिच्या आयुष्यात आदिलची एन्ट्री झाली आहे आणि राखी व आदिलच्या लव्ह ड्रामाच्या चर्चा जोरात आहेत.