Join us

थुकरट वाडीमध्ये होणार विनोदाची आतिषबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:30 IST

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

ठळक मुद्देभाऊ कदम सलमान खानची व्यक्तिरेखा साकारणार आहेविनोदवीर तेरे नाम या चित्रपटावर आधारित एक विनोदी स्पूफ सादर करणार आहेत

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सध्या आयपीएल सुरु असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटची हवा आहे. पण अशा वेळी चला हवा येऊ द्या त्यांच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'चला हवा येऊ द्या'च विशेष सिलेब्रिटी पर्व भेटीस घेऊन येणार आहे.

या विशेष पर्वात विनोदाचे चौकार, षट्कार आणि विनोदाची आतिषबाजी असणार आहे. या पर्वात झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचे लाडके एकूण १६ सिलेब्रिटी सहभागी होणार आहेत. येत्या आठवड्यात प्रेक्षकांना छाया व रघु आणि अवध्या व निमकर म्हणजेच अभिनेता मोहिनीराज गटणे, प्रवीण डाळिंबकर, अवधूत जोशी आणि मिताली साळगावकर हे कलाकार प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलणार आहेत.

याशिवाय झी ५ वरील 'हुतात्मा' या वेब सिरीजमधील कलाकार वैभव तत्ववादी, सचिन खेडेकर, अंजली पाटील, अभय महाजन आणि मोहन आगाशे थुकरट वाडीच्या मंचावर सज्ज होणार आहेत. त्यांच्यासाठी थुकरट वाडीतील विनोदवीर तेरे नाम या चित्रपटावर आधारित एक विनोदी स्पूफ सादर करणार आहेत. ज्यामध्ये भाऊ कदम सलमान खानची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्यामुळे प्रेक्षक हसून हसून लोटपोट होणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे हि धमाल 'चला हवा येऊ द्या'मध्ये सोमवार मंगळवार रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :चला हवा येऊ द्यावैभव तत्ववादीसचिन खेडेकर