साऊथची अभिनेत्री प्रियामणी (Priyamani) नुकतीच शाहरुख खान(Shah Rukh Khan)सोबत जवान (Jawan) या चित्रपटात दिसली. प्रियामणीने या चित्रपटात उत्कृष्ट काम केले आहे. जवानच्या यशानंतर ही अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. जवानापूर्वी 'द फॅमिली मॅन' (The Family Man) वेब सीरिज'मुळे प्रियामणी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रेक्षक या अभिनेत्रीला सुची उर्फ सुचित्रा तिवारी या नावानेच ओळखतात. तिने या सीरिजमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Vajpayee) यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियामणीने द फॅमिली सीझन ३ बद्दल मोठा खुलासा केला आहे. द फॅमिली ३ च्या शूटिंगबाबत अभिनेत्रीने अपडेट्स दिले आहेत.
'द फॅमिली मॅन' ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि हिट वेब सीरिज आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि दाद मिळाली आहे. प्रेक्षक तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. 'द फॅमिली मॅन'ची चार वर्षे पूर्ण झाल्यावर, निर्माते जोडी राज आणि डीके यांनी तिसऱ्या सीझनची घोषणा केली होती. नुकतेच प्रियमणीने द फॅमिली मॅन सीझन ३ बाबत एक मोठे अपडेट दिले आहे. 'जवान' स्टार प्रियामणीला विचारण्यात आले की द फॅमिली मॅन सीझन ३ कधी रिलीज होणार आहे? यावर ती म्हणाली की, “मला वाटतं राज सर आणि डीके सरांनी कालच ही घोषणा केली आहे. सीझन ३ लवकरच येत आहे, त्यामुळे प्रतीक्षा करा आणि पाहा."
पुढील वर्षी शूटिंगला होईल सुरूवातअभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा ते दोघेही शाहिद कपूरच्या 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये काम करत होते तेव्हा ती दिग्दर्शक राज आणि डीके यांना भेटली होती. जेव्हा मी त्यांना सीझन ३ बद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, लवकरच... लवकरच. मला खात्री आहे की ती येईल. मला वाटतं आम्ही पुढच्या वर्षी शूटिंग सुरू करणार आहोत.
अजय देवगण सोबतचा अनुभव...याशिवाय प्रियामणीने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत मैदान या चित्रपटात काम करण्याचा तिचा अनुभव शेअर केला. पीरियड फिल्ममध्ये काम करणे तिच्यासाठी अप्रतिम अनुभव होता. मला अजय सर आणि अमितसोबत काम करायला खूप मजा आली. अजय सर एक उत्कृष्ट अभिनेते आहेत, त्यांचे डोळेही खूप काही बोलतात."