Join us

लहानपणी मुलाच्या भूमिका का साकारल्या? 'मिसमॅच्ड' फेम अहसास चन्नाचा मोठा खुलासा; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:30 IST

अभिनेत्री अहसास चन्ना (Ahsaas Channa) 'मिस्डमॅच- ३' या वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे.

Ahsaas Channa : अभिनेत्री अहसास चन्ना (Ahsaas Channa) 'मिस्डमॅच- ३' या वेब सीरिजमुळे सध्या चर्चेत आहे. बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात  पदार्पण करून अभिनेत्रीने इंडस्ट्रीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'वास्तूशास्त्र' या चित्रपटाच्या माध्यमातून अहसासने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात केली. त्यानंतर तिने 'कभी अलविदा न कहना', 'माय फ्रेंड गणेशा', 'वास्तूशास्त्र' यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. दरम्यान नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अहसासने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये मुलाच्या भूमिका का साकारल्या? याबद्दल तिने खुलासा केला आहे.

नुकतीच अहसास चन्नाने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुलाच्या भूमिका साकारण्यामागचं कारणही सांगितलं. त्यादरम्यान मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, "मुलाच्या भूमिका मी जाणीवपूर्वक केल्या नव्हत्या तर परिस्थितीमुळे मला त्या भूमिका कराव्या लागल्या. जेव्हा मी चार वर्षांची होते तेव्हा माझ्या आईने 'वास्तूशास्त्र' चित्रपटामध्ये एका मुलाची भूमिका करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं. त्यावेळी तो चित्रपट हिट झाला. त्यानंतर मला इंडस्ट्रीत लोक ओळखू लागले. मग मी 'कभी अलविदा ना कहना' मध्ये काम केलं." परंतु मुलाच्या भूमिकेसाठी आपले केस लहानच ठेवण्यात यावे, असा आग्रह त्यावेळी इंडस्ट्रीकडून आला होता आणि त्याचा मानसिक आरोग्यावर झाला असंही तिने म्हटलं आहे.

पुढे अभिनेत्री सांगितलं, "मुलांच्या भूमिकेने मी कधीच प्रभावित झाले नाही. मला माहिती होतं की तो एक माझ्या अभिनयाचा भाग आहे. अगदी कमी वयातच शाळा आणि अभिनय या दोन्ही गोष्टींता समतोल मी राखला. मात्र, 'कभी अलविदा ना कहना' नंतर माझ्या आईने मला मुलांच्या भूमिका करणं थांबवावं असं सांगितलं."

अभिनेत्री अहसास चन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अहसास चन्ना ओटीटीवर चांगलीच लोकप्रिय आहे. 'कोटा फॅक्टरी','हाफ सीए' या सीरिजही तिने गाजवल्या आहेत. आता 'मिसमॅच्ड'सीरिजमध्येही ती महत्वाच्या भूमिकेत आहे.

टॅग्स :वेबसीरिजसेलिब्रिटीसिनेमा