Join us

37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरातच आढळला मृतदेह; काजोलसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 14:02 IST

आणखी एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीत खळबळ निर्माण झाली आहे.

सिनेमा, वेबसीरिजध्ये छोट्या छोट्या भूमिका साकारणारी अभिनेत्री नूर मालबिका दासचं (Noor Malabika Das) निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरीच तिने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर बराच वेळ कोणालाच कल्पना नव्हती. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजा तोडला.  तेव्हा तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केले गेले मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. 

नूरच्या घरी पोलिसांना काही औषधं, मोबाईल आणि डायरी मिळाली. तिचं पार्थिव गोरेगाव येथील सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. पोलिसांकडून तिच्या कुटुंबाला संपर्क केला गेला मात्र तो होऊ शकला नाही. अखेर पोलिसांनी एका विशिष्ट संस्थेच्या मदतीने तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नूरने आत्महत्या का केली याचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

३७ वर्षीय अभिनेत्री नूर कतार एयरवेजमध्ये एअरहॉस्टेस होती. काजोलच्या 'द ट्रायल' वेबसीरिजमध्ये तिने भूमिका साकारली होती. याशिवाय तिने 'देखी अनदेखी','तीखी चटनी' सारख्या सीरिजमध्येही काम केलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यूवेबसीरिजबॉलिवूड