Join us  

अभिनेत्री प्रिया बापटची नवी वेबसीरिज 'रात जवां है', म्हणते - "कथानकाने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 6:44 PM

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट लवकरच सोनी लिव्हवरील सीरिज रात जवां हैमध्ये झळकणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता ती लवकरच सोनी लिव्हवरील सीरिज रात जवां हैमध्ये झळकणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिरीजमध्‍ये सुमनची भूमिका साकारणारी प्रिया बापट हा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि तिला सतत मिळत असलेले कौतुक पाहून भारावून गेली आहे.

वेबसीरिजच्‍या या ट्रेलरमधून तिची परिवर्तनात्‍मक भूमिका दिसून आली आहे, तसेच प्रेक्षकांना या सिरीजच्‍या उत्तम कथानकाची लक्षवेधक झलक देखील पाहायला मिळते. सिरीजचे कथानर तीन जिवलग मित्र - राधिका (अंजली आनंद), अविनाश (बरूण सोबती) आणि सुमन (प्रिया बापट) यांच्‍या अनपेक्षित जीवनाला सादर करते, जेथे ते सर्वात रोमांचक प्रवासाची सुरूवात करतात, ते म्‍हणजे तान्‍ह्या मुलांचे संगोपन. सुमनची भूमिका साकारण्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना अभिनेत्री प्रिया बापट म्‍हणाली की, “कथानकाने प्रबळ पाया रचला असला तरी सुमीत व्‍यास (दिग्‍दर्शक) आणि ख्‍याती आनंद-पुथरन (लेखक व निर्माते) यांचे माहितीपूर्ण मार्गदर्शन मोलाचे ठरले, ज्‍यामुळे माझी भूमिका सुमनला आकार मिळाला. त्‍यांचे दिग्‍दर्शन व लेखनामुळे मला सुमनच्‍या भूमिकेमधील भावनिकतेबाबतच्या बारकाव्‍यांचा शोध घेण्‍यास व आत्‍मसात करण्‍यास मदत झाली. त्‍यांच्‍या पाठिंब्‍यामुळे मी या भूमिकेच्‍या आत्‍मनिरीक्षणशील व संघर्षाची सवय नसलेल्या स्‍वभावाला वास्‍तविकपणे सादर करू शकले.''    

यामिनी पिक्‍चर्स प्रा. लि. द्वारे निर्मित सिरीज ‘राज जवां है'चे लेखन व निर्मिती ख्‍याती आनंद - पुथरन यांनी केले आहे आणि अत्‍यंत प्रतिभावान सुमीत व्‍यास यांनी दिग्‍दर्शन केले आहे. तसेच या सिरीजचे निर्माते विकी विजय आहेत. ११ ऑक्‍टोबरपासून फक्‍त सोनी लिव्‍हवर ही सीरिज पाहायला मिळेल.

टॅग्स :प्रिया बापट