Join us

'बंदिश बैंडिट्स'नंतर श्रेया चौधरी झळकणार या प्रोजेक्ट्समध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 20:00 IST

Shreya Chaudhary: श्रेया चौधरीने 'बंदिश बैंडिट्स' या सीरिजमधून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.

श्रेया चौधरीने ॲमेझॉन प्राइमवरील लोकप्रिय सीरीज 'बंदिश बैंडिट्स'मधून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या सीरिजमधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तेव्हापासून, श्रेया चित्रपट निर्मात्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. तिने शोमध्ये तिच्या अविश्वसनीय अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. श्रेयाने एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला अधिक उत्तम होण्यासाठी वेळ दिला आहे आणि त्यानंतर आता ती ॲमेझॉन प्राइमवरील दोन टेंटपोल प्रोजेक्ट्स घेऊन परतली आहे.

यावर्षी, श्रेया चौधरी ‘द मेहता बॉईज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून अभिनेता बोमन इराणी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. श्रेया बहुप्रतिक्षित सीरीज बंदिश बैंडिट्स दुसऱ्या सीझनमध्येही तिची भूमिका पुन्हा साकारणार आहे. श्रेया म्हणते, “एक अभिनेत्री म्हणून, मी करत असलेल्या कामाच्या दृष्टीने आणि लोक मला कोण म्हणून पाहतील या दृष्टीने हे निश्चितच माझे सर्वोत्तम वर्ष आहे. अॅमेझॉन प्राइम वीडियो सारख्या जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर दोन टेंटपोल प्रोजेक्ट्स असणे आश्चर्यकारक वाटते! एक कलाकार म्हणून माझ्याकडे असलेल्या विविध गुण ते दाखवतील.”

बोमन इराणीसोबतच्या तिच्या चित्रपटाबद्दल बोलताना श्रेया म्हणाली, “बोमन इराणी सरांसारख्या क्रिएटिव्ह मास्टरमाईंडकडून दिग्दर्शन करण्याची संधी दररोज मिळतेच असे नाही! द मेहता बॉईजमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही शिकायला मिळाले आणि मला अभिमान वाटतो की मी त्यांच्या व्हिजनचा भाग होण्यासाठी मी पुरेशी चांगली आहे असे त्यांना वाटले!”

बंदिश बँडिट्स सीझन २

बंदिश बँडिट्स सीझन २ च्या घोषणेवर तिचा उत्साह व्यक्त करताना, श्रेया पुढे म्हणाली, माझी मालिका बंदिश बँडिट्स २ या वर्षी देखील प्रदर्शित होईल. त्यामुळे मी खूप आनंदी आहे! बंदिश बँडिट्स सीझन १ ने मला एक अभिनेत्री म्हणून खूप प्रशंसा दिली, खूप प्रेम दिले.