Join us  

'पंचायत 3' हिट होताच सचिवजींच्या नवीन सिरीजचा टिझर, रिलीज डेटसाठी सोडवा हे कोडं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 4:29 PM

'पंचायत 3' सध्या चर्चा असतानाच सचिवजी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमारच्या नवीन सीरिजचा टिझर रिलीज झालाय. त्यासाठी हे गणित सोडवा आणि रिलीज डेट जाणून घ्या (panchayat 3, kota factory 3)

 'पंचायत 3'  ची सध्या चांगलीच चर्चा आहे.  जितेंद्र कुमारची प्रमुख भूमिका असलेली ही वेबसीरिज चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. जितेंद्र कुमारने सीरिजमध्ये साकारलेली सचिवजींची भूमिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.  'पंचायत 3' ची चर्चा असतानाच जितेंद्र कुमारच्या नवीन सीरिजचा टिझर भेटीला आलाय. या टिझरमध्ये रिलीज डेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना एक कोडं घालण्यात आलंय.

'कोटा फॅक्टरी 3' ची  घोषणा

'पंचायत 3' सध्या सुपरहिट होतंय तोच जितेंद्र कुमारच्या 'कोटा फॅक्टरी 3' या आगामी सीरिजचा विशेष टिझर भेटीला आलाय. या सीरिजनिमित्त जितेंद्र पुन्हा एकदा जितू भय्याच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कोटा फॅक्टरी' सीरिजचे  याआधीचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. आता  'कोटा फॅक्टरी 3' च्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. यासाठी प्रेक्षकांना 8+4x3-6+2+3/3×2-3 असं गणित घालण्यात आलंय. या गणितात सीझनची रिलीज डेट लपली आहे.

तर या दिवशी  'कोटा फॅक्टरी 3' होणार रिलीज

अनेकांनी हे गणित सोडवलं असून 'कोटा फॅक्टरी 3' जून महिन्याच्या 20 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सवर  'कोटा फॅक्टरी 3' चा 20 जूनला प्रिमियर होईल. सीरिजमध्ये जितेंद्र कुमार प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय या सीझनमध्ये अभिनेत्री तिलोत्तमा शोमे झळकणार आहे. तसेच मयुर मोरे, एहसास छन्ना, आलम खान, रंजन राज हे कलाकार पाहायला मिळतील. 'कोटा फॅक्टरी 3'  साठी सर्वजण नक्कीच उत्सुक असतील यात शंका नाही.

टॅग्स :जितेंद्रकोटाआयआयटी मुंबई