Join us

'३६ डेज'मध्ये अमृता खानविलकर आणि शरीब हाश्मी दिसणार एकत्र, अभिनेत्री म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 7:53 PM

36 Days : '३६ डेज' या सीरिजच्या निमित्ताने अमृता खानविलकर आणि शरीब हाश्‍मी पहिल्‍यांदाच पडद्यावर एकत्र येत आहेत. या सीरिजमध्ये ते दोघे जोडप्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सोनी लिव्‍हची ओरिजिनल सीरिज '३६ डेज' (36 Days Web Series) १२ जुलै रोजी प्रसारित होणार असताना प्रेक्षकांमध्‍ये उत्‍सुकता शिगेला पोहोचली आहे. हा क्राइम थ्रिलर लबाडी, फसवणूक, प्रेम आणि कटकारस्‍थानांच्‍या चक्रव्‍यूहाच्‍या माध्‍यमातून रोलरकोस्‍टर राइडवर घेऊन जातो. या सीरिजच्या निमित्ताने अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि शरीब हाश्‍मी (Sharib Hashmi) पहिल्‍यांदाच पडद्यावर एकत्र येत आहेत. या सीरिजमध्ये ते दोघे जोडप्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

अमृता खानविलकर सांगते की, ''आम्‍ही पहिल्‍यांदा ओटीटी अवॉर्ड्समध्‍ये एकमेकांना भेटलो आणि आमच्‍यामध्‍ये लगेचच मैत्री झाली. शरीबला त्‍याचा पहिला ओटीटी अवॉर्ड देण्‍याचा क्षण अभिमानास्‍पद होता. मला माहित होते की, तो प्रतिभावान व समर्पित अभिनेता आहे. शरीबची कलेप्रती समर्पितता अत्‍यंत प्रेरणादायी आहे आणि सिरीज '३६ डेज'मध्‍ये त्‍याच्‍यासोबत एकत्र काम करण्‍याचा अनुभव अविश्‍वसनीय आहे. सीरिजमध्‍ये आम्‍ही साकारत असलेल्या भूमिका ललिता व विनोद यांच्‍यामध्‍ये गुंतागुंतीचे व आगळे नाते आहे आणि त्‍याच्‍यासोबत या भूमिका साकारण्‍याचा अनुभव आव्‍हानात्‍मक आणि समाधानकारक आहे. तुमचा परफॉर्मन्‍स वाढवणारा सह-कलाकार मिळणे, सहसा घडत नाही, पण शरीबच्‍या बाबतीत अगदी तसेच घडले. मी प्रेक्षकांना या सिरीजमध्‍ये आम्‍ही सादर केलेली केमिस्‍ट्री आणि भावनिकता पाहताना बघण्‍यासाठी उत्‍सुक आहे.'' 

सिरीज '३६ डेज'मध्‍ये शरिब हाश्‍मीने गोव्‍यामधील हॉटेल एमराल्‍ड ओशियन्‍स स्‍टार सूट्समधील जनरल मॅनेजर विनोद शिंदेची भूमिका साकारली आहे. विनोदची भूमिका सामान्‍य घरातील विनम्र सुरूवातीपासून आदरयुक्‍त पद मिळवण्‍यापर्यंत दाखवण्‍यात आली आहे. तसेच अमृता खानविलकरने साकारलेली भूमिका त्‍याची पत्‍नी ललितासोबत आव्‍हानांचा सामना करावा लागतो. दुसरीकडे, ललिता ही गुंतागुंतीची भूमिका आहे.

अमृता खानविलकर व शरीब हाश्‍मी यांच्‍याव्‍यतिरिक्‍त '३६ डेज'मध्‍ये नेहा शर्मा, पुरब कोहली, सुशांबत दिवगीकर, श्रुती सेठ आणि चंदन रॉय सन्‍याल हे प्रतिभावान कलाकार देखील आहेत. गोव्‍यातील सुप्रसिद्ध उपनगरीय गृहनिर्माण इस्‍टेटच्‍या शांत पार्श्‍वभूमीवर आधारित ही सिरीज हत्‍येचा शोध घेण्‍यास सुरू होते, जेथे घटनांची साखळी सुरू होते, जी लुप्‍त सिक्रेट्सचा उलगडा करते. तणाव व रहस्‍य वाढत जातात तसे प्रेक्षकांमध्‍ये रहस्‍य जाणून घेण्‍याची उत्‍कंठा निर्माण होईल. प्रत्‍येक एपिसोडमध्‍ये मानवी स्‍वभवाच्‍या गडद पैलूंचा उलगडा होईल. विशाल फ्यूरिया यांचे दिग्‍दर्शन असलेली सिरीज '३६ डेज'ची निर्मिती बीबीसी स्‍टुडिओज इंडियासोबत सहयोगाने अप्‍लॉज एंटरटेन्‍मेंटने केली आहे. 

टॅग्स :अमृता खानविलकर