Join us

कौटुंबिक नातेसंबंधावर आधारीत मनोरंजक कहाणी 'आरंभ' वेबसीरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 4:59 PM

पहिल्या मुलाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पत्नी स्मितासोबत अमेरिकेत राहणाऱ्या श्रीकांत शर्माची थरारक कहाणी 'आरंभ' या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे.

सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या विषयांवर आधारीत वेबसीरिज दाखल झाल्या आहेत. त्यात आता आणखी एक नवीन वेबसीरिज रसिकांच्या भेटीला आली आहे. या वेबसीरिजचं नाव आहे आरंभ. ही सीरिज वॉचोवर पाहायला मिळणार आहे. कौटुंबिक नातेसंबंध दृढ होणे, परंपरा टिकवून ठेवणे आणि फसव्या व्यवस्थेविरुद्ध चा धोकादायक संघर्ष या मालिकेतून उलगडण्यात आला आहे. शौर्य सिंह दिग्दर्शित 'आरंभ' वेब सीरिजची निर्मिती सिल्व्हर रेन पिक्चर्स आणि एमएजी एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.

पहिल्या मुलाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पत्नी स्मितासोबत अमेरिकेत राहणाऱ्या श्रीकांत शर्माची थरारक कहाणी 'आरंभ' या वेब सीरिजत दाखवण्यात आली आहे. दरम्यान, श्रीकांतचे वडील उदय शंकर शर्मा रांचीजवळील लाल नगर या शांत उपनगरात आपल्या धाकट्या मुलाच्या कुटुंबासह शांततेत जीवन जगत आहेत. मात्र, उदय शंकर शर्मा यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाल्याने नशिबाला क्रूर वळण लागते.

आपल्या लाडक्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी श्रीकांत भारतात परतला. भारतात पोहोचल्यावर श्रीकांतला एक धक्कादायक सत्य सापडते - त्याच्या वडिलांचा मृतदेह वैद्यकीय शिक्षणासाठी रुग्णालयात दान करण्यात आला आहे, तर त्याच्या कुटुंबाला संमती देण्यासाठी फसवण्यात आले आहे, परंतु सत्य त्याहून अधिक त्रासदायक होते. एका वॉर्ड बॉयने अनैतिक मार्गचा अवलंब करून मृतदेह अवयव तस्करीसाठी विकल्याचे त्याला समजले. श्रीकांतला न्याय मिळेल आणि वडिलांवर अंत्यसंस्कार होतील की अत्यंत धोकादायक लोकांशी संवाद साधून त्रासाला आमंत्रण देणार? या वेब सीरिजमध्ये अमित गौर, करण ठाकूर, दीपाली शर्मा आणि मनीष खन्ना या कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखा जिवंत केल्या आहेत.