Join us

'तू चुकून टॉप घालायला विसरली का?', अनन्या पांडेच्या बहिणीला वडिलांनीच केलं ट्रोल; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 19:30 IST

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना आणि तिच्या वडिलांचं मजेशीर संभाषण

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेने (Alanna Panday) काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला. अलाना पांडे अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये स्थायिक आहे. तिने तिथल्याच मुलाशी लग्नही केलं. आता ते आईबाबा झाले आहेत. चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे (Chikki Panday) यांची अलाना मुलगी आहे. अलाना नुकतीच मुंबईत आली असता तिने घातलेल्या कपड्यांवरुन तिच्या वडिलांनीच तिला ट्रोल केलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

अलाना पांडे लवकरच 'द ट्राईब'  या शोमध्ये दिसत आहे. ती इन्फ्लुएन्सर असून त्यांचे युट्यूब व्लॉग्स खूप लोकप्रिय होतात. अलानाच्या 'द ट्राईब' या शोमधला एक सीन सध्या व्हायरल होतोय. यामध्ये अलाना कुटुंबासोबत बसली आहे. अलानाच्या समोर तिचे वडील चिक्की पांडे बसले आहेत. ते अलानाकडे पाहून म्हणतात की, 'अलाना तू चुकून टॉप घालायला विसरली आहे का?' वडिलांचा हा प्रश्न ऐकून अलानाला धक्काच बसतो. ती म्हणते, 'तुम्ही गंमतीत विचारत आहात ना? यात काय वाईट आहे. हा ब्रालेट टॉप आहे.' यावर चिक्की पांडे म्हणतात, 'ब्रालेट टॉप नावातच ब्रा आहे. टॉप नाही. हे लॉस एजिलिस नाही तर बांद्रा आहे.' यानंतर अलाना वडिलांना समजावते. 

चिक्की पांडे यांचं लेकीसोबतचं हे संभाषण अगदीच मजेशीर आहे. यात अलानाची आईही बसली आहे. ती सुद्धा हे बघून हसते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले, 'चला कोणीतरी आहे ज्यांना चूक बरोबर याची ओळख आहे','ब्रालेट सुद्धा अंडरगार्मेंटच असतात'. 

अलानाचा हा शो 'द ट्राईब' धर्माटिक एंटरटेन्मेंटने निर्मित केला आहे. याचे ९ एपिसोड्स आहेत. अमेझॉन प्राईमवर वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे.

टॅग्स :अनन्या पांडेबॉलिवूडपरिवारट्रोलसोशल मीडिया