Join us

अनन्या पांडेची वेबसीरिज 'कॉल मी बे'मधील पहिलं गाणं 'वेख सोहनेया' रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 4:25 PM

Ananya Panday :अनन्या पांडेची आगामी सीरिज 'कॉल मी बे'च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर यातील पहिले गाणे रिलीज झाले आहे.

अनन्या पांडे (Ananya Panday) वेबसीरिजमध्ये पदार्पण करते आहे. तिची आगामी सीरिज 'कॉल मी बे'(Call me Bae)च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर यातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'वेख सोहनेया' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे पाहिल्यानंतर या सीरिजची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.

वेबसीरिज आणि गाण्याबद्दल अनन्या पांडे म्हणाली की, "प्रेक्षकांमध्ये दिसणारा ट्रेलरबद्दलचा उत्साह आणि प्रेम जबरदस्त आहे. संपूर्ण वेबसीरिज आणि माझ्या पात्राची इतक्या उत्तमरीत्या ओळख करून देणारी या गीतासारखी दुसरी कोणतीही बाब नसेल. ज्या क्षणी मी 'वेख सोहनेया' ऐकले त्या क्षणापासून या गीताने मला वेड लावले. खरेच या गाण्याने माझ्या हृदयात आणि मी ऐकत असलेल्या गाण्यांच्या यादीत पुन्हा पुन्हा जागा मिळवली. माझ्यासह प्रत्येकाला आनंदी करणाऱ्या या गीताच्या निर्मितीबद्दल संगीत संयोजकांचे अभिनंदन!"

'वेख सोहनेया' गाण्याला आवाज देणारी गायिका, गीतकार आणि संगीतकार बॉम्बे द आर्टिस्ट म्हणाली की,'वेख सोहनेया'ची निर्मिती करणे नक्कीच आयुष्यातील एक विलक्षण अनुभव आहे. हे गीत आपल्या पहिल्याच धूनपासून प्रेक्षकांना 'कॉल मी बे'च्या जगात खेचून नेते. हे गीत मुंबई आणि बेच्या प्रवासातील जिवंत आणि गतिमान परंतु सोबतच आत्मीय क्षणांना दर्शवते. प्रेक्षक 'कॉल मी बे'च्या जगात पाऊल ठेवतील आणि या गीताबरोबर त्याचा अनुभव घेतील, हे पाहून मला खूप आनंद होत आहे.

वीर दास, गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफेरी, निहारिका लिरा दत्त, लिसा मिश्रा आणि मिनी माथूर यांच्या प्रमुख भूमिका असलेली 'कॉल मी बे' ही करण जोहर, अपूर्वा मेहता यांच्यासह धर्माटीक एंटरटेनमेंटची निर्मिती आहे तर सोमेन मिश्रा या वेब सिरीजचे कार्यकारी निर्माते आहेत. 'कॉल मी बे ' या वेब सिरीजचे दिग्दर्शन कॉलिन डी'कुन्हा यांनी केले असून इशिता मोइत्रा यांची निर्मिती आहे. ही वेब सिरीज येत्या ६ सप्टेंबरपासून प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :अनन्या पांडे