Join us  

अनन्या पांडेने 'कॉल मी बे'च्या सीझन २ची केली घोषणा, करीना कपूरशी का होतेय तुलना?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:38 PM

Ananya Panday : अभिनेत्री अनन्या पांडेने 'कॉल मी बे'मधून वेब सीरिजच्या दुनियेत प्रवेश केला. ही अभिनेत्री तिच्या पदार्पणाच्या मालिकेपासूनच लोकप्रिय झाली आणि तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday)ने 'कॉल मी बे'(Call Me Bae)मधून वेब सीरिजच्या दुनियेत प्रवेश केला. ही अभिनेत्री तिच्या पदार्पणाच्या मालिकेपासूनच लोकप्रिय झाली आणि तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. 'कॉल मी बे'च्या पहिल्या सीझनची जादू रसिकांच्या मनातून उतरली नसताना, आता अनन्या पांडेने तिच्या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा करून चाहत्यांना चकित केले.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये 'कॉल मी बे'च्या सर्व पात्रांची झलक दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमचा दिवस यापेक्षा बे- टर नसता. बेला दुसऱ्या सीझनमध्येही तिची जादू पसरवणार आहे. सीझन २ तयार होत आहे.

अनन्या पांडेच्या या सीरिजमध्ये गुरफतेह पिरजादा, वरुण सूद, निहारिका लिरा दत्त, विहान सामत, मुस्कान जाफरी, लिसा मिश्रा आणि वीर दास यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनन्याच्या बेला या पात्राची तुलना 'कभी खुशी कभी गम'मधील करीना कपूरच्या 'पू' भूमिकेशी केली जाते. करण जोहरनेही सांगितले होते की, शोमधील बेलाची भूमिका पू यांच्यापासून प्रेरित होती.

करण जोहरने अनन्या पांडेच्या 'बेला'चे वर्णन 'पू'चे जनरल झेड व्हर्जन असे केले होते. करणच्या मते, जर पूजा आणि रोहनला चित्रपटात मुलगी असती तर ती बेलासारखी झाली असती. याबाबत इस्टंट बॉलिवूडशी बोलताना अनन्या म्हणाली होती की, करीनाची भूमिका आयकॉनिक होती आणि तिला त्यात छेडछाड करायची नाही. ती फक्त तिच्याकडून प्रेरणा घेते.

टॅग्स :अनन्या पांडे