अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सर्वात चर्चेत असते. मूळ दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आता हिंदीतही सक्रीय झाली आहे. नुकतीच तिची 'सिटाडेल हनी बनी' सीरिज रिलीज झाली. याशिवाय समंथा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिचा एक्स हसबंड नागा चैतन्यने नुकतंच दुसरं लग्न झालं. यानंतर समंथाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली.
२०२४ चा शेवटचा महिना सुरु आहे. येत्या काही दिवसात वर्ष संपणार आहे. समंथाने याचसंबंधी पोस्ट शेअर केली. त्यात लिहिले आहे की, "जसं जसं वर्ष संपतंय, आपण झालेल्या चढ उतारांचा विचार करतो ज्यामुळे आपल्या प्रवासाला आकार मिळतो. आव्हानांपासून ते यश, विकास आणि आनंदाच्या क्षणापर्यंत, तुम्ही एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणेच स्वत:चं अस्तित्व अबाधित ठेवलं. यावर्षाने तुमची परीक्षा बघितली, पण आपल्याला ताकद, दृढताही शिकवली."
समंथा आणि नागा चैतन्यचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर समंथा कोसळली होती. नैराश्यात गेली. त्यातच तिला मायोसायटिस आजाराचं निदान झालं. समंथाची तब्येत खूप खालावली होती. तिने अभिनयापासून ब्रेकही घेतला. त्यातच नागा चैतन्यचं दुसरं लग्न झालं. शिवाय काही दिवसांपूर्वी समंथाच्या वडिलांचं निधन झालं. या सर्व घटनांमुळे समंथा अनेक गोष्टींना तोंड देत असल्याचं दिसून येत आहे.