Join us

अखेर प्रतीक्षा संपली! अभिनेता अनिल कपूरचा 'नाईट मॅनेजर'चा दुसरा सीझन या दिवशी येणार भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 19:22 IST

Anil Kapoor's The night Manger : अभिनेता अनिल कपूरच्या द नाईट मॅनेजर या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.

अभिनेता अनिल कपूर(Anil Kapoor)च्या 'द नाईट मॅनेजर' (The Night Manager) या वेबसीरिजची जोरदार चर्चा झाली. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. अनिल कपूरच्या अभिनयाची जादू या वेबसीरिजमध्ये पहायला मिळाली. पहिल्या सीझननंतर चाहते दुसऱ्या भागाची उत्सुकतेने वाट पाहत होते. दरम्यान, आज अनिल कपूर याने त्याच्या सोशल मीडियावरुन द नाईट मॅनेजर २ची अधिकृत घोषणा केली आहे. पुन्हा एकदा हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सगळ्यांना याची उत्सुकता आहे. 

शेवटच्या एपिसोडनंतर सगळयांना या वेब शोच्या पुढच्या सीझनची उत्सुकता होती. दुसरा सीझन तयार होत असताना, अनिल कपूरने सोशल मीडियावर या सुपरहिट वेब शोची  रिलीज डेट आणि सीझन दोनची अधिकृत घोषणा केली आहे. द नाईट मॅनेजरमधील शेली रुंगटा पात्राने सगळ्यांची मन जिंकली. या सीरिजमध्ये अनिल कपूर एक शस्त्रास्त्र व्यापाऱ्याच्या भूमिकेत आहे. तसेच आदित्य रॉय कपूर आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र सिंडिकेटची माहिती शोधण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या एजंटची भूमिका बजावत आहे. ही मालिका ३० जून रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. डिस्नेने याबाबत माहिती दिली आहे.

अनिल कपूरशिवाय हे आहेत कलाकारया वेब सीरिजमध्ये अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. नाईट मॅनेजर २चे दिग्दर्शन संदीप मोदी आणि प्रियंका घोष यांनी केले आहे. नाईट मॅनेजरमध्ये शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर नाईट मॅनेजरचा पहिला भाग १६ फेब्रुवारीला रिलीज करण्यात आला होता. 

आगामी प्रोजेक्ट्सअभिनेता अनिल कपूर यांच्याकडे रणबीर कपूरसोबत अॅनिमल, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत फायटर, त्यानंतर सुभेदार आणि अँड्रॉइड कुंजप्पन Ver 5.25 चे हिंदी रूपांतरित हे आगामी प्रोजेक्ट्स आहेत.

टॅग्स :अनिल कपूरआदित्य रॉय कपूर