'इंडियन पोलिस फोर्स' ही वेब सिरीज चित्रपट निर्माता रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) या दोघांची पहिली वेब सिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्राइम व्हिडिओ इंडियावर १९ जानेवारी, २०२४ रोजी प्रीमियर होईल. पण त्याआधी, उद्या म्हणजेच १६ डिसेंबरला या सीरिजची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
सिद्धार्थ मल्होत्राने 'इंडियन पुलिस फोर्स' या वेब सिरीजचे नवीन पोस्टर त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉयही दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करताना सिद्धार्थ मल्होत्राने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमीही दिली आहे. सिद्धार्थ मल्होत्राने लिहिले की, 'फोर्स स्टँड बायवर आहे, कारवाईसाठी तयार आहे. ओवर एंड आउट!' यासोबतच त्यांनी सांगितले की, वेब सीरिजचा टीझर उद्या म्हणजेच १६ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
रोहित शेट्टी पहिल्यांदाच बनवतोय वेब सीरिज दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीने यापूर्वीच्या एका मुलाखतीत सीरिजबद्दल सांगितले होते, "'इंडियन पुलिस फोर्स' निर्माता म्हणून माझ्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे, जो मी आणि रोहित शेट्टी पिक्चर्सच्या टीमने अनेक वर्षांच्या मेहनतीने बनवला आहे. मला आमच्या कलाकारांचा आणि क्रूचा खूप अभिमान आहे, ज्यांनी या अॅक्शन सीरिजच्या निर्मितीसाठी पूर्ण पाठिंबा दिला. ही मालिका भारतीय पोलीस अधिकार्यांच्या शौर्य, त्याग आणि धैर्याचा गौरव करते.
ही वेब सिरीज ७ भागांची आहे'इंडियन पुलिस फोर्स' ही रोहित शेट्टीने तयार केलेली सात भागांची अॅक्शन-पॅक मालिका आहे. या सीरिजमध्ये श्वेता तिवारी, निकितिन धीर, ऋतुराज सिंग, मुकेश ऋषी आणि ललित परिमू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ही सीरिज देशभरातील भारतीय पोलिस अधिकार्यांची निःस्वार्थ सेवा, बिनशर्त वचनबद्धता आणि प्रखर देशभक्ती दाखवणार आहे.