Join us

देवाने गावाला दिलेली शिक्षा अन् विष्णुचे अवतार! 'ही' रहस्यमय थ्रिलर सीरिज ओटीटीवर रिलीज; कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:13 IST

तेलुगु भाषेतील एका वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. कोणती आहे ही वेबसीरिज, जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये 'कांतारा'पासून 'हनुमान'पर्यंत पौराणिक कथांवर आधारीत सीरिज आणि सिनेमे रिलीज होत आहेत. या कलाकृतींना प्रेक्षकांनी चांगलंच प्रेम दिलंय. लवकरच बॉलिवूडमध्ये 'रामायण' या महाकाव्यावर आधारीत सिनेमा रिलीज होणार आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी या दोघांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. अशाच पौराणिक कथेवर आधारीत एका वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा आहे. ही वेबसीरिज म्हणजे 'हरिकथा'. का होतेय या वेबसीरिजची इतकी चर्चा? जाणून घ्या.

हरिकथा वेबसीरिजची इतकी चर्चा का?

'हरिकथा' ही तेलुगु भाषेतील सध्या चर्चेत असलेली वेबसीरिज. या सीरिजच्या कथेबद्दल सांगायचं तर सीरिजची कहाणी एका गावाच्या भोवती फिरते. या गावात अचानक गावकऱ्यांची हत्या होताना दिसते. याशिवाय एका पोलीस अधिकाऱ्याचाही खून होतो. त्यानंतर या सर्वांना कोण मारतंय याचा तपास करण्यासाठी पोलिसांची टीम तैनात होते. आता गावात लोकांची हत्या करणारा कोणी माणूस आहे की देवाने त्यांना शिक्षा दिलीय, हा मुख्य प्रश्न वेबसीरिज पाहताना मनात येतो.

कुठे बघायला मिळेल?

या वेबसीरिजमध्ये भगवान विष्णुच्या अवतारांबद्दलही माहिती कळते. सीरिजच्या अखेरपर्यंत वेबसीरिजमध्ये खूप ट्विस्ट अँड टर्न येतात. सीरिजच्या शेवटी अर्थात क्लायमॅक्सपर्यंत हत्यांमागचा सूत्रधार नेमका कोण, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. याशिवाय सीरिजमध्ये काही भयानक दृश्य आहेत जे पाहून अंगावर काटा येतो. राजेंद्र प्रसाद यांनी सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. १३ डिसेंबरला ही सीरिज रिलीज झाली असून डिस्ने+ हॉटस्टारवर तुम्ही बघू शकता. विशेष म्हणजे ही सीरिज मराठीतही डब असल्याने तुम्ही तिचा आनंद घेऊ शकता.

टॅग्स :वेबसीरिज