Join us

'हिरामंडी'च्या 'या' अभिनेत्रीला भन्साळींनी दिले मानधनापेक्षा अतिरिक्त पैसे; कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:21 IST

Heeramandi: मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजमध्ये अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री झळकल्या आहेत. मात्र, यात एक अभिनेत्री अशी आहे जिला मानधनाच्या व्यतिरिक्त अधिक पैसे देण्यात आले होते.

संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansale) यांनी 'हिरामंडी' (heeramandi) या वेब सीरिजच्या माध्यमातून पहिल्यांदाच ओटीटीवर पदार्पण केलं. विशेष म्हणजे दरवेळी प्रमाणे त्यांची ही सीरिज सुद्धा तुफान हिट झाली. त्यामुळे सध्या या सीरिजची,त्यातील कलाकारांची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होतीये. मल्टीस्टारर असलेल्या या सीरिजमध्ये अनेक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्री झळकल्या आहेत. मात्र, यात एक अभिनेत्री अशी आहे जिच्या अभिनयावर खूश होऊन भन्साळींनी तिला मानधनाच्या व्यतिरिक्त १५०० रूपये अतिरिक्त दिले होते.

'हिरामंडी' या सीरिजमध्ये फत्तो ही सहाय्यक भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जयती भाटिया. नुकतीच जयतीने एबीपी लाइव्हला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सेटवर संजय लीला भन्साळी यांचं सेटवरचं वागणं कसं होतं. एकंदरीत सेटवर कसं वातावरण असायचं यावर भाष्य केलं. इतकंच नाही तर कोणत्याही कलाकाराचा अभिनय आवडल्यानंतर भन्साळी त्या कलाकाराला ५०० रुपये बक्षीस म्हणून द्यायचे, असंही तिने सांगितलं.

"संजय लीला भन्साळी त्यांच्या प्रत्येक कलाकारासोबत प्रेमाने, आदराने वागतात असा लोकांचा समज झाला आहे. पण, जेव्हा मी त्यांना सकाळी भेटायला गेले होते त्यावेळी त्यांनी मला मिठी मारली आणि मला गालावर किस केलं. सोबतच जेव्हा त्यांना एखाद्या कलाकाराचा अभिनय आवडतो त्यावेळी ते त्या कालाकाराला बक्षीस स्वरुपात ५०० रुपये देतात", असं जयती म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मला त्यांनी आतापर्यंत १५०० रुपये बक्षीसस्वरुपात दिले आहेत. त्यांना कोणताही शॉट आवडला की ते ओके बोलत नसे. त्याऐवजी ते जियो फत्तो असं म्हणून ५०० रुपये हातावर टेकवायचे."

दरम्यान, जयती यांनी भन्साळींनी दिलेले पैसे जपून ठेवले आहेत. या सीरिजमध्ये जयतीने फत्तो ही छोटेखानी भूमिका साकारली होती. मात्र, त्याचा अभिनय प्रभावी ठरला आणि त्यांची भूमिका गाजली.

टॅग्स :वेबसीरिजसंजय लीला भन्साळीसेलिब्रिटीबॉलिवूड